ईव्हीएम’ व ‘व्हीव्हीपॅट’ प्रात्यक्षिक जनजागृतीचा शुभारंभ

  




जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दाखवली हिरवी झेंडी


अकोला, दि.  १४ : लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रणा मतदारांना अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.मतदारांनी या यंत्रणेची प्रात्यक्षिके पाहून शंकानिरसन करून घ्यावे, या उद्देशाने गावोगावी जनजागृती करणार  असुन मतदान यंत्र,व्हीव्हीपॅट यंत्रणा माहिती देणाऱ्या मोबाईल व्हॅनला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले.

यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी महेश परांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून भारत निवडणूक आयोगाने ईव्हीएम व  व्हीव्हीपॅटची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली. त्याचे प्रशिक्षण प्रसार, प्रसिद्धी व जनजागृतीसाठी जिल्हा कार्यालय व उपविभागीय कार्यालयात ईव्हीएम  व  व्हीव्हीपॅट मशीन्स उपलब्ध करून देत प्रात्यक्षिक केंद्रेही कार्यान्वित करण्यात आलेली आहेत.

मतदारांना मतदान यंत्रांची प्रक्रिया स्वत: बघावी  प्रारूप मतदान करून त्यांनी केलेले मतदान   व्हीव्हीपॅट यंत्राद्वारे पडताळून बघता यावे, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रणेबाबत सर्व शंकाचे निरसन करता यावे, या उद्देशाने मतदान यंत्र मोबाईल व्हॅन गावोगावी फिरून जनजागृती करणार आहे.
नागरिकानी जनजागृती मोबाईल व्हॅनच्या  माध्यमातुन प्रारूप मतदान तसेच ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रणेबाबत असणाऱ्या सर्व शंकाचे निरसन करून घ्यावे,असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.

०००००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ