अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करा - जिल्हाधिकारी अजित कुंभार

 





अकोला, दि. २२ : अंमली पदार्थांची वाहतूक, विक्री, वापर याला प्रतिबंध करतानाच, या पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत भरीव जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.
जिल्हास्तरीय नार्को-ऑर्डिनेशन समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती कार्यक्रम शाळा- महाविद्यालयांमधून तसेच स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने ठिकठिकाणी आयोजित करावेत.
गांजा, अफू, बोंडे आदी लागवड होऊ नये यासाठी तहसीलदार व मंडळ अधिकारी यांनी तालुका स्तरावर, तर तलाठी व ग्रामसेवक यांनी ग्राम स्तरावर पाहणी दरम्यान काही आढळल्यास तिथे पोलिसांच्या मदतीने कार्यवाही करावी. कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी करताना असे काही निदर्शनास आल्यास तत्काळ कळवावे. औषध विक्रेत्यांच्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा लावणे अनिवार्य आहे. रेल्वे स्थानक, प्लॅटफॉर्म व इतर वाहनांचीही यंत्रणेकडून तपासणी व्हावी. कारखान्यातून अंमली पदार्थांचे उत्पादन होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासन राज्य उत्पादन शुल्क व पोलीस संयुक्त पथकाने नियमित पाहणी व कार्यवाही करावी, असेही निर्देश त्यांनी दिले. विविध यंत्रणांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ