जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

 


अकोला, दि : १३ : जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ मध्ये फ्रांस (ल्योन) येथे होणार असून आयोजित केलेल्या जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने ५२ क्षेत्राशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने कौशल्य  स्पर्धा जिल्हा, विभाग, राज्य आणि देशस्तरावर घेतली जाणार असून याद्वारे गुणवान कौशल्यधारक पात्र स्पर्धक निवडले जाणार असून जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ग.प्र बिटोडे यांनी केले आहे.जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन २९ डिसेंबर २०२३ ते १० जानेवारी २०२४ कालावधीत जिल्हयातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच तांत्रिक विद्यालयाच्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.

जागतीक कौशल्य स्पर्धा जगातील सर्वात मोठी व्यवसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्ठता स्पर्धा असून जगभरातील २३ वर्षाखालील तरूणांकरिता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची ही स्पर्धा ऑलपिंक खेळासारखीच आहे, या स्पर्धेमध्ये भारतातील प्रतिभासंपन्न व कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने अकोला जिल्हयातील युवक-युवतींनी विविध ५२ क्षेत्रामध्ये होणा-या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्यासाठी https://kaushalya.mahaswayam.gov.in या महास्वयंम वेबपोर्टलवर संधी उपलब्ध करण्यात आली आहे.

जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ करीता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म  १ जानेवारी, २००२ किंवा तद्नंतरचा असावा. तसेच,आडेटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, क्लाऊड कंप्युटींग, सायबर सिक्युरिटी, डिजिटल कन्स्ट्रकशन, इंडस्ट्रियल डिझाईन टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री ४.०, इन्फॉरमेशन नेटवर्क केबलिंग, मेकॅट्रॉनिक्स आणि रोबोट इंटिग्रेशन & वॉटर टेक्नॉलॉजी या क्षेत्राकीता उमेदवाराचा जन्म १ जानेवारी, १९९९ किंवा तद्नंतरचा असणे अनिवार्य आहे. याप्रमाणे फ्रांन्स (ल्योन) येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ साठी जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवरुन प्रतिभासंपन्न कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने आयोजित स्पर्धेकरिता सर्व शासकीय आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एमएसएमई टूल रूम्स, सिपेट, आयआयटी, अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतन महाविद्यालये, आयएचएम/हॉस्पिटेलिटी इंस्टीट्यूट, कॉर्पोरेट टेक्निकल इंस्टीट्यूट, स्किल ट्रेनिंग इंस्टीट्यूट, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, एमएसबीव्हीटी, खाजगी कौशल्य विद्यापीठ, इंस्टीट्यूट ऑफ ज्वेलरी मेकिंग, इतर सर्व प्रशिक्षण संस्था, कला, वाणिज्य, विज्ञान शाखेची कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, तसेच, महाराष्ट्र राज्य कौशल्य सोसायटी कडे अधिनस्त सर्व व्यवसायिक कौशल्य प्रशिक्षण संस्था, विविध व्यावसायिक आस्थापना आणि कारखाने यांचेकडील विहीत वयोमर्यादेतील इच्छूक प्रतिभासंपन्न व कुशल उमेदवारांचे नामांकन या स्पर्धेसाठी करता येईल. तसेच स्पर्धेत निवड झालेल्या उमेदवारांना वेळोवेळी लागणारे मार्गदर्शन व सहाय्य महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, मुंबई यांचेकडून करण्यात येईल कळविण्यात आले आहे.

जागतिक कौशल्य स्पर्धेत नोंदणी करण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०२३ पर्यंत असून स्पर्धेत सहभाग घेण्यास इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांनी www.skillindiadigital.gov.in लिंकवर भेट देऊन नोंदणी करुन आपला सहभाग निश्चित करावा,असे आवाहन ग.प्र बिटोडे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांनी केले आहे.
000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ