अल्पसंख्यांक अधिकार सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

 


१४ ते २१ डिसेंबर दरम्यान अल्पसंख्यांक अधिकार सप्ताह

अकोला,(जिमाका), दि: १४:  १८ डिसेंबर अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात येत असून अल्पसंख्याकांना घटनात्मक आणि कायदेशीर हक्काबाबत जाणीव व  जनजागृती करण्याबाबत १४ डिसेंबर ते २१ डिसेंबर दरम्यान अल्पसंख्यांक अधिकार सप्ताह राबविण्यात येत असून त्या निमित्ताने जिल्हा व तालुका स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

अल्पसंख्यांक अधिकार सप्ताहात इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता भित्तिपत्र व निबंध स्पर्धा तर इयत्ता अकरावी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता वक्तृत्व स्पर्धा,व्याख्यानमाला,चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेत सहभागी होत तालुका व जिल्हास्तरावर यश संपादन करणाऱ्या स्पर्धकांना २७ डिसेंबर रोजी जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित जिल्हास्तरीय अल्पसंख्यांक हक्क दिवस समारोहामध्ये बक्षीस वितरण करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे. 0000

जि.प.पोटनिवडणूक मतदानाकरिता दोन तासाची सवलत देण्यात यावी -जिल्हाधिकारी अजित कुंभार

सार्वजनिक सुट्टी लागू नाही अशा आस्थापनेवरील मजूर कर्मचारी यांना मतदानासाठी सवलत


अकोला, (जिमाका) दि: १४: रविवार १७ डिसेंबर रोजी चोहोट्टा बाजार जिल्हा परिषद सर्कल मध्ये पोटनिवडणूक होत असून रविवार हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस असल्यामुळे क्रमांक १६ चोहोट्टा क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता निवडणूक कार्यक्रम लागू असलेल्या क्षेत्रात १७ डिसेंबर रोजी इतर सर्व आस्थापना (ज्यांना सुट्टी लागू होत नाही) त्यांच्या आस्थापनेवरील क्षेत्रातील रहिवासी असलेले अधिकारी,कर्मचारी, मजूर,कामगार यांना मतदान करता येणे शक्य व्हावे.याकरिता कामाच्या तासातून दोन तासाची सवलत देण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत.0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ