जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन


 अकोला दि.22- जागतिक कौशल्य स्पर्धा सन 2024 मध्ये फ्रांस  येथे होणार असून आयोजित केलेल्या जागतिक स्तरावरील कौशल्‍य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने 52 क्षेत्राशी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, Sector Skill Council, विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने Skill Competition  आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हा, विभाग, राज्य आणि देशस्तरावर स्पर्धा घेतली जाणार असून याद्वारे गुणवान कौशल्यधारक पात्र स्पर्धक निवडले जाणार आहेत.
National Development Corporation
 (NSDC)  मार्फत प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सुचनानुसार जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन जानेवारी 2024 मध्ये संबंधित जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच तांत्रिक विद्यालयाच्या ठिकाणी आयोजित करण्याची शक्यता आहे
सदर स्पर्धा दर दोन वर्षानी होते आणि ही जगातील सर्वांत मोठी
 व्यवसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्ठता स्पर्धा असून जगभरातील 23 वर्षाखालील तरुणांकरिता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची ही स्पर्धा ऑलंपिक खेळासारखीच आहे. या स्पर्धेमध्ये भारतातील प्रतिभासंपन्न व कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने अकोला जिल्हयातील युवक- युवतींनी विविध 52 क्षेत्रामध्ये होणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी नोदणी करण्यासाठी htts://Kaushalya.mahaswayam.gov.in या महास्वयंम वेबपोर्टलवर संधी उपलब्ध करण्यात आली आहे.
यापुर्वी 46 जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये 62 सेक्टर मधुन 50 देशातील दहा हजार उमेदवार समाविष्ट असुन सदर स्पर्धा 15 देशात 12 आठवड्यासाठी आयोजित करण्यात आली होती. यापुढील जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 मध्ये फ्रांस
 येथे आयोजित होणार आहे.
जागतिक कौशल्य स्पर्धा 2023 करीता वयोमर्यादा हा एकमेव निकष ठरविण्यात आलेला आहे. सदर स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 2002 किंवा तदनंतरचा असावा तसेच आडेटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, क्लाऊड कंप्युटींग, साबर सिक्युरिटी, डिजिटल कन्स्ट्रकशन, इंडस्ट्रियल डिझाईन टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री 4.0 इन्फॉरमेशन नेटवर्क केबलिंग मेकॅट्रॉनिक्स आणि रोबट इंटिग्रेशन आणि वॉटर टेक्नॉलॉजी क्षेत्राकरीता उमेदवारांचा जन्म दि. 1 जानेवारी 1999 किंवा तदनंतरचा असणे अनिवार्य आहे याप्रमाणे फ्रांन्स येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा 2024 साठी जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवरुन प्रतिभासंपन्न कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने आयोजीत
 स्पर्धेकरिता सर्व शासकीय आणि खाजगी  औद्योगीक प्रशिक्षण संस्था एमएसएमई टुल रुम्स सिपेट, आयआयटी अभियांत्रिकी महाविद्यालय तंत्रनिकेतन महाविद्यालय  आयएचएम/ हॉस्पॅलिटी इंस्टीट्युट  ऑफ ज्वेलरी मेकिंग इतर सर्व प्रशिक्षण संस्था कला वाणिज्य  विज्ञान  शाखेची कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य सोसायटी कडे अधिनस्त सर्व व्यवसायिक कौशल्य प्रशिक्षण संस्था विविध व्यावसायिक आस्थापना आणि कारखाने यांचेकडील विहीत वयोमर्यादेतील इच्छूक प्रतिभासंपन्न व कुशल उमेदवारांचे नामांकन या स्पर्धेसाठी करता येईल तसेच या स्पर्धेत निवड झालेल्या  उमेदवारांना वेळोवळी लागणारे मार्गदर्शन व सहाय्य महाराष्ट्र राज्य कौशल्‍य विकास सोसायटी मुंबई यांचेकडून करण्यात येईल असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
जागतिक कौशल्य स्पर्धेत नोदणी करण्याची शेवटची तारीख 07/01/2024 पर्यंत आहे. तरी स्पर्धेत सहभाग घेण्यास इच्छूक असलेल पात्र उमेदवारांनी
 www.skillindiadigital.gov.in लिंकवर भेट देऊन नोदणी करून आपला सहभाग निक्ष्चीत करावा, असे आवाहन श्री. ग.प्र. बिटोडे सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला यांनी केले आहे.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ