‘ईव्हीएम’ व ‘व्हीव्हीपॅट’ प्रात्यक्षिक केंद्रे कार्यान्वित प्रारूप मतदानातून पडताळा घेता येणार

 

अकोला, दि.  १३ : लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रणा मतदारांना अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मतदारांनी या यंत्रणेची प्रात्यक्षिके पाहून शंकानिरसन करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून भारत निवडणूक आयोगाने ईव्हीएम व  व्हीव्हीपॅटची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली. त्याच्या प्रशिक्षण , प्रसार, प्रसिद्धी व जनजागृतीसाठी जिल्हा कार्यालय व उपविभागीय कार्यालयात ईव्हीएम  व  व्हीव्हीपॅट मशीन्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तिथे तशी प्रात्यक्षिक केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. निवडणूकीची घोषणा होईपर्यंत ही केंद्रे सुरू राहणार आहेत.
जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी भूसंपादन, काटेपूर्णा, मोर्णा प्रकल्प यांच्या कार्यालयात, तसेच अकोट, बाळापूर, अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मूर्तिजापूर या  उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रात्यक्षिक केंद्र  स्थापन करण्यात आले आहे.  तिथे केंद्र अधिकारी  व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदारांना तिथे प्रात्यक्षिके बघता  येतील, तसेच प्रारूप  मतदान करून  त्यांनी केलेले मतदान   व्हीव्हीपॅट यंत्राद्वारे  पडताळून  बघता येईल.
मतदारांनी मतदान यंत्रांची प्रक्रिया स्वत: बघावी  तसेच प्रारूप मतदान करून ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रणेबाबत सर्व शंकाचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे. सर्व केंद्रे कार्यालयीन वेळेत सुरू राहतील.
0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ