चोहट्टा बा.जि.प.सर्कलमध्ये मतदान,तीन दिवस मद्यविक्रीस मनाई

 

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे आदेश

अकोला,(जिमाका) , दि : १५: अकोला जिल्हा परिषद अंतर्गत १६-चोहोट्टा बाजार येथे जिल्हा परिषदेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक मतदान होणार असून मतदानाच्या आधीचा संपुर्ण दिवस १६ डिसेंबर,मतदानाचा दिवस १७ डिसेंबर मतदान संपेपर्यंत व मतमोजणीचा दिवस १८ डिसेंबर मतमोजणी कार्यक्रम संपेपर्यंत अनुज्ञप्ती बंद  ठेवत कोरडा दिवस पाळत मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत.

निवडणुका  कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीकोणातुन खुल्या, मुक्त व निर्भय वातावणात पार पाडण्यासाठी मतदान,मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री करण्यास मनाई करीत कोरडा दिवस जाहिर करण्याबाबत नियमान्वये मतदानाच्या अगोदरचा दिवस, मतदानाचा दिवस व मतमोजणीचा संपूर्ण दिवस मद्य विक्रीसाठी कोरडा दिवस म्हणुन पाळणे अनुज्ञप्तीधारकांवर बंधनकारक आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ