जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला यांचे प्रयत्नातुन सेवानिवृत्त कर्मचा-यास मिळणार सेवानिवृत्ती वेतन आणि उपदान रक्कम


अकोला, दि. 22 :    जिल्हा  विधी सेवा  प्राधिकरण  , अकोला  हे  मा. प्रमुख  जिल्हा व सत्र  न्यायाधिश  मार्गदर्शनानुसार कार्यरत आहे.    अर्जदार  भास्कर  उकर्डा  उगले, यांनी दि. 13 सप्टेंबर 2023  रोजी त्यांचे  विधीज्ञ  गजानन  भोपळे  यांचे  मार्फत    जिल्हा  विधी सेवा  प्राधिकरण  , अकोला      यांचेकडे  अर्ज देवून विनंती  केली की, त्यांची  शासकीय   कार्यालयांनी  रोखलेली उपदान रक्कम  व सेवानिवृत्तीची वेतनाची रक्कमे  संबंधीची वाद  मिटविण्यासाठी सहकार्य  करावे.  अर्जदार  हा लघुपाटबंधारे उपविभाग पातुर येथे कार्यरत होते.  व दिनांक 31 ऑक्टोबर 2016  रोजी सेवानिवृतत  झाले.  अर्जदार याने  चार   विविध  पतसंस्थाकडुन  खुप  वर्षाआधी  कर्ज घेतले  होते. त्याची परतफेड न झाल्यामुळे  अर्जदाराचे सेवानिवृत्ती वेतन  तसेच  उपदान   रक्कम  मागील  7 वर्षापासुन रोखून ठेवण्यात आली होती.
‍ि‍िजिल्हा
 विधी सेवा  प्राधिकरण  , अकोला     यांनी सर्व संबंधीतांना नोटीस काढून कार्यालयात बोलाविले. त्या चार विविध  पतसंस्था  यांनी चर्चेअंती नियमाप्रमाणे कर्ज आणि व्याजाची रक्कम माफ  करण्याची तयारी दाखवली. तसेच अर्जदार ज्या ठिकाणी  कार्यरत होते त्या लघुपाटबंधारे विभागाने चर्चेअंती  अर्जदारास त्याचे  रोखलेली उपदान व  सेवानिवृत्ती वेतन  नियमाप्रमाणे देण्याचे  मान्य केले.  सदरचे प्रकरणात जिल्हा विधी सेवा  प्राधिकरण, अकोला चे सचिव योगेश सु. पैठकर यांनी मध्यस्थी केली आणि सामोपचाराने वाद मिटविण्यात आला. याबद्दल अर्जदार भास्कर उकर्डा उगले यांनी समाधान व्यक्त केले .अर्जदाराचे विधीज्ञ  गजानन भोपळे यांनी देखील मध्यस्थी करून प्रकरण सामोपचाराने मिटविल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अकोला यांचे आभार मानले.
‍िजिल्हा
 विधी सेवा  प्राधिकरण  , अकोला   येथे कोणत्याही  प्रकारचे वाद हे सामोपचाराने मिटविण्यासाठी प्रयत्न केले जातात. अकोला जिल्ह्यातील नागरीकांनी त्यांचे वाद मिटविण्यासाठी  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अकोला येथे संपर्क  साधावा असे आवाहन योगेश सु पैठणकर  सचिव यांनी केले. संपर्काकरीता दुरध्वनी क्रमांक 0724-2410145 मो. क्रमांक  8591903930  8591903930 असा आहे.
000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ