राष्ट्रीय लोकअदालतीत 13 हजार 460 प्रकरणे निकाली

  



अकोला दि. 15 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणातर्फे दि. 9 डिसेंबर रोजी अकोला जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालय तसेच कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, कौटुंबीक न्यायालय, औद्योगिक न्यायालय व जिल्हा ग्राहक तक्रार आयोग, अकोला येथे  राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. त्यात 13 हजार 460 प्रकरणे निकाली काढण्यात आली.


जिल्ह्यातील सर्व न्यायालयात प्रलंबित प्रकरणांपैकी एकूण 10 हजार 953 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये तडजोडीकरीता ठेवण्यात आली होती. त्यापैकी एकूण 1 हजार 253 प्रलंबित प्रकरणात व एकूण 12 हजार 207 दाखलपूर्व प्रकरणात समेट घडून आला. अशी एकूण 13 हजार 460 प्रकरणे निकाली काढण्यात आली. यामध्ये मुख्यत्वे दिवाणी, फौजदारी, वैवाहिक वाद स्वरूपाची तसेच मोटार वाहन अपघात प्रकरण व कलम 138 एन.आय.ॲक्ट आणि ग्रामपंचायतचे घरपट्टी / पाणीपट्टी तसेच महावितरण व बँकांची खटलापूर्व प्रकरणात तडजोड होऊन रक्कम रू. 19 कोटी 63 लक्ष 59 हजार 242 रू. ची तडजोड झाली.
लोक न्यायालय यशस्वी होण्याकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशाचे तत्कालिन अध्यक्ष एस.के. केवले, जिल्हा व सत्र न्यायाधीशाचे प्रभारी प्रमुख ए.डी. क्षिरसागर तसेच सर्व न्यायाधीश, न्यायालयीन कर्मचारी, वकील वृंद यांचे योगदान लाभले. जिल्हा विधी सेवा प्राधिरणाचे अधीक्षक डी.पी.बाळे, वरिष्ठ लिपिक संजय रामटेके, राजेश देशमुख, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई तसेच लोकअभिरक्षक कार्यालयातील विधीज्ञ आणि न्यायीक कर्मचारी, विधी स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. सदर लोकअदालत यशस्वी पार पाडणेकरीता अकोला बार असोसिएशन तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, यांचे सहकार्य लाभले.
00000--

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ