‘मानवी हक्क दिना’निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रम





मानवी हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यक्रम

अकोला, दि. ११ :  'मानव हक्क दिनानिमित्त' जिल्हाधिकारी कार्यालयात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आज मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. त्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांसह महिलाभगिनींचाही चांगला सहभाग होता.

अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर,  ‘मानवाधिकार वृत्त’चे संपादक विजय गडलिंग, शाळा तपासणी अधिकारी प्रकाश अंधारे, समन्वय अधिकारी गजानन महल्ले आदी उपस्थित होते.

  मानव हक्कांचे संरक्षण व्हावे यासाठी 10 डिसेंबर हा 'मानव हक्क दिवस' म्हणून निश्चित करण्यात आला आहे. कोणत्याही देशाच्या नागरिकांच्या मानव हक्कांचे रक्षण हा त्या देशातील लोकशाही व्यवस्थेचा महत्वाचा भाग आहे. सामान्य जनतेच्या मानव हक्काचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारकडून सक्षम व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. देशपातळीवर राष्ट्रीय मानव हक्क आयोग तर राज्य पातळीवर राज्य मानव हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली आहे, असे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

 यावेळी नागरिकांचे हक्क, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या, राज्य मानव हक्क आयोगाची रचना, कार्यपद्धती आणि अधिकार याबाबत विविध मान्यवरांकडून सविस्तर माहिती देण्यात आली. ‘मानवाधिकार वृत्त’च्या अंकाचे प्रकाशनही यावेळी झाले.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ