निवडणूकविषयक कामकाजाबाबत जिल्हाधिका-यांकडून आढावा




 निवडणूकविषयक कामकाजाबाबत जिल्हाधिका-यांकडून आढावा

 अकोला, दि. १ : अद्यापपर्यंत मतदार म्हणून नोंदणी न झालेल्या सर्व व्यक्तींची नोंदणी आगामी शिबिरांच्या माध्यमातून करावी, तसेच आगामी निवडणूक लक्षात घेता सर्व नोडल अधिका-यांनी आवश्यक पूर्वतयारी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.

निवडणूकीच्या अनुषंगाने नोडल अधिका-यांची बैठक जिल्हाधिका-यांच्या दालनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, उपजिल्हाधिकारी विजय पाटील, अनिल माचेवाड, डॉ. शरद जावळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, महिला व बालविकास अधिकारी राजश्री कोलखेडे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, जिल्हा माहितीविज्ञान अधिकारी अनिल चिंचोले आदी उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, जिल्ह्यातील एकही पात्र व्यक्ती मतदार म्हणून नोंदणी झाल्याशिवाय राहू नये. त्यासाठी विविध घटकांपर्यंत पोहोचून नोंदणी होऊ न शकलेल्या व्यक्तींची नोंदणी करावी. महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला मतदार, त्याचप्रमाणे, शिक्षणाधिकारी व महाविद्यालयांच्या माध्यमातून नवीन मतदारांपर्यंत पोहोचून अधिकाधिक नोंदणी करावी. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त नोडल अधिका-यांनी निवडणूक आयोगाच्या हँडबुक, मॅन्युअल, मॉडेल चेकलिस्ट आदींचा अभ्यास करून आवश्यक पूर्वतयारी करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

 निवडणूकीसाठी विषयनिहाय नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यात ‘स्वीप’ची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांच्याकडे, तर कायदा व सुव्यवस्था, सिक्युरिटी प्लॅन, आदर्श आचारसंहिता कक्ष आदी जबाबदारी अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

 मनुष्यबळ, प्रशिक्षण व वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्याकडे, साहित्य व्यवस्थापनाची जबाबदारी श्री. माचेवाड यांच्याकडे, संगणकीकरण, सायबर सुरक्षितता, कम्युनिकेशन प्लॅन, वोटर हेल्पलाईन व माहिती तंत्रज्ञान आदी जबाबदारी माहितीविज्ञान अधिकारी श्री. चिंचोले यांच्याकडे व ईव्हीएम व्यवस्थापनाची जबाबदारी उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांच्याकडे देण्यात आली आहे.

खर्च सनियंत्रणाची जबाबदारी प्र. कॅफो योगेश धोंगडे यांच्याकडे, बॅलट पेपर, पोस्टल बॅलेट आदी जबाबदारी खनिकर्म अधिकारी प्रणिता चापले यांच्याकडे, ॲक्सेसिबिलिटी नोडल अधिकारी म्हणून श्रीमती कोलखेडे, माध्यम नोडल अधिकारी म्हणून श्री. पवार व निरीक्षकांसाठी नोडल अधिकारी म्हणून कृषी अधिक्षक श्री. किरवे यांना नेमण्यात आले आहे.  

००००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ