जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पालकमंत्री कार्यालयाचा शुभारंभ

 


अकोला, दि. २९ : जिल्ह्याच्या पालकमंत्री कार्यालयाचा शुभारंभ  महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आज झाला.

आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, हरिश पिंपळे, वसंत खंडेलवाल,
जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण होण्यासाठी व आवश्यक विकासकामांना चालना मिळण्यासाठी हे कार्यालय महत्वाचे ठरेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. पालकमंत्री कार्यालयात स्वतंत्र वॉररूम स्थापित करण्यात आली असून त्याद्वारे प्रशासनाच्या कामकाजाचा नियमित आढावा घेतला जाणार आहे.

पालकमंत्री कार्यालयाचे नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांची नियुक्ती करण्यात आली असून, अव्वल कारकून व इतर मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे.
०००




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ