जिल्हास्तरीय युवा महोत्सव ४ व ५ डिसेंबरला

 जिल्हास्तरीय युवा महोत्सव ४ व ५ डिसेंबरला

 

अकोलादि.१ : क्रीडा विभागातर्फे दि. 15 ते 29 या वयोगटातील युवक व युवतींच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी जिल्हास्तरीय युवा महोत्सव दि. ४ व ५ डिसेंबरला रोजी वसंत देसाई स्टेडियम येथे  होणार आहे.

 तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर, सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान ही संकल्पना घेऊन विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन महोत्सवात करण्यात आले आहे. समूह लोकनृत्य, वैयक्तिक सोलो लोकनृत्य, लोकगीत, वैयक्तिक सोलो लोकगीत, कथालेखन, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, फोटोग्राफी आदी स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. युवा कृतीअंतर्गत हस्तकला, वस्त्रोद्योग, ॲग्रो प्रॉडक्टचा समावेश आहे.

जिल्हास्तरीय युवा महोत्सवातून उत्कृष्ट कलाकारांचा संघ, कलाकारांची निवड करून विभागस्तरावर पाठविण्यात येईल. विभागीय युवा महोत्सवातून निवडीनंतर राज्यस्तरीय युवा महोत्सवात सहभाग दिला जाईल. प्रत्येक प्रकारात जिल्हा व विभागस्तरावर पहिल्या तीन क्रमांकांना आकर्षक बक्षीसे देण्यात येणार आहेत.

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात जास्तीत जास्त विद्यार्थी, युवक, युवती सहभाग घेण्याच्या दृष्टिकोनातून शाळा, महाविद्यालयांना त्यांना प्रोत्साहित करावे. शासकीय, निमशासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्थांनीही आपल्या अधिपत्याखालील अधिकारी, कर्मचारी युवा महोत्सवाच्या सहभागाच्या अटी व शर्ती पुर्ण करीत असल्यास त्यांना सहभाग घेण्यास प्रोत्साहित करावे. इच्छूकांनी नाव, शाळा, महाविद्यालय, कार्यालयाचे नाव, जन्म तारीख व संपर्क क्र. ईमेल आयडी आदी माहिती आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे दि. २ डिसेंबरला सायंकाळपर्यंत सादर करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांनी केले आहे.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ