दुकानांचे नामफलक मराठीत लावणे बंधनकारक



अकोला, दि. 8 : महाराष्ट्रक  दुकाने व आस्थापना अधिनियमांतर्गत सर्व  व्या‍वसायिक दुकान आणि आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये  लावण्याबाबतची अधिसूचना  शासनाने  निर्गमित केली आहे .
या अधिनियमांतर्गत दुकानदारांनी अंमलबजावणी  करण्यााबाबत  कामगार आयुक्त यांनी आदेश दिले आहेत. अकोला  जिल्ह्यातील  सर्व दुकाने व आस्थापनांचे  नामफलक मराठी भाषेमध्ये  ठळक अक्षरात दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे.
मराठी  भाषेतील  नामफलक  इतर  भाषेत  असलेल्या   नामफलकापेक्षा मोठ्या व  ठळक अक्षरात असावे. जे आस्थापनाधारक  आपल्या आस्थापनेचे  नामफलक मराठी भाषेमध्ये दर्शनी भागावर लावणार नाहीत, त्या आस्थापनामालकावर कारवाई करण्यात येईल. याबाबत प्रत्येक आस्थापनाधारकाने दक्षता घ्यावी, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त डॉ. रा.दे. गुल्हाने यांनी केले आहे. 
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ