अविष्कार 2023 निवड चाचण्या यजमानपदाचा मान यंदा पीजीआयव्हीएएसला

 

अकोला, दि ,१५:  राज्यस्तरीय अविष्कार 2023 या संशोधन स्पर्धेत भाग घेण्यासाठी महाराष्ट्र पशु व मत्स्य  विज्ञान विद्यापीठ  , नागपुर  अंतर्गत पशुवैद्यक , दुग्ध तंत्रज्ञान  व मत्स्य विज्ञान विद्याशाखेतील एकुण 10 घटक  महाविद्यालयांतील स्पर्धक  विद्यार्थ्याकरींता विद्यापीठस्तरीय   निवड चाचण्या आयोजीत  करण्याचा मान यावर्षी  स्नातकोत्तर  पशुवैद्यक  व पशुविज्ञान संस्थाअकोला  या संस्थेस  प्राप्त  झाला आहे.दिनांक 18-19  डिसेंबर दरम्यान दोन दिवस चालणा-या  या कार्यक्रमात  स्नातक,  स्नातकोत्तर वर्गातून विविध वर्गवारीत    विदयार्थ्यांची निवड प्रक्रिया  पार पाडली जाणार आहे. यासाठी विद्यापीठातील अंदाजे एकूण  50 स्पर्धक  विद्यार्थी व  संशोधक या निवड प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.  विविध महाविद्यालयांचे संशोधन समन्वयक देखील या   कार्यक्रमास उपस्थित  असतील.  सदर  निवड प्रक्रिया  ही माफसु चे संशोधन  संचालक  प्रा. डॉ.  नितीन  कुरकुरे यांच्या प्रमुख           उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती  संस्थेचे  सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. चैतन्य पावशे यांनी दिली. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ