पोस्ट्स

शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी ‘लोकसंवाद’ अभियान ; महिला व बालविकास विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची दिली माहिती ; जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम

इमेज
शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी ‘लोकसंवाद’ अभियान महिला व बालविकास विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची दिली माहिती जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम अकोला दि 20 : महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील लोकसहभागाचा महत्त्वाचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागांतर्गत  जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून ‘लोकसंवाद-2026’ हा विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत  शहरातील डाबकी रोड येथील समाज सेवा गणेशोत्सव मंडळ येथे महिला व बालविकास विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली. याप्रसंगी महिला बालविकास विभागाच्या जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे नितीन अहिर, बाल कल्याण समितीच्या सदस्य प्रांजली जयस्वाल, वन स्टॉप सेंटरच्या ॲड.मनीषा भोरे, रेल्वे चाइल्ड लाईनचे पद्माकर सदांशिव, स्वप्नील शिरसाट, चाइल्ड हेल्प लाईनचे रोहित भाकरे, वैभव भदे, समाजसेवा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष राजेश काळे, विनायक अनासने, मनोज देशमुख,अभय कुलकर्णी,राम मंग...

शिवार फेरीचा उत्साहात शुभारंभ ; अद्ययावत तंत्र व संशोधनाचा शेतक-यांना लाभ करून द्यावा - कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

इमेज
  शिवार फेरीचा उत्साहात शुभारंभ अद्ययावत तंत्र व संशोधनाचा शेतक-यांना लाभ करून द्यावा  - कृषी मंत्री दत्तात्रय भरणे अकोला, दि. २० :  शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढण्यासाठी उत्पादनखर्चात घट होऊन उत्पादनात वाढ होणे आवश्यक आहे. त्यामुळे तज्ज्ञांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तेथील स्थिती व अडचणी समजवून घ्याव्यात  व अद्ययावत तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचवावे, असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे शिवार फेरी व चर्चा सत्राचे उद्घाटन कृषिमंत्री श्री. भरणे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार किरण सरनाईक, आमदार धीरज लिंगाडे, कृषी सचिव परिमल सिंह, कुलगुरू डॉ शरद गडाख, माजी आमदार अमोल मिटकरी, रामेश्वर ठाकरे, संचालक विस्तार शिक्षण तथा आयोजक डॉ. धनराज उंदीरवाडे आदी उपस्थित होते. कृषी मंत्री श्री. भरणे म्हणाले की, कृषी विद्यापीठातर्फे आयोजित शिवार फेरी शेतकरी बांधवांसाठी मार्गदर्शक आहे. येथील विविध पीकांची प्रात्यक्षिके, प्रयोग महत्वपूर्ण आह...

अमरावती विभागातील पीक परिस्थितीचा आढावा शासन शेतक-यांच्या खंबीरपणे पाठीशी; भरीव मदत करणार मुदतपूर्व पीक पाहणी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश शेतक-यांच्या अडचणी संवेदनशीलतेने सोडवा -कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

इमेज
 अमरावती विभागातील पीक परिस्थितीचा आढावा शासन शेतक-यांच्या खंबीरपणे पाठीशी; भरीव मदत करणार मुदतपूर्व पीक पाहणी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश शेतक-यांच्या अडचणी संवेदनशीलतेने सोडवा -कृषिमंत्री दत्तात्रय भरणे अकोला, दि. २० : एलनिनो संकटामुळे पावसात खंड पडला आहे. त्यामुळे शेतकरी बांधव संकटात सापडला आहे. शासन शेतक-यांच्या खंबीरपणे पाठीशी असून, भरीव मदत करण्यात येईल. सर्व सरकारी यंत्रणांनी शेतकऱ्यांच्या अडचणी संवेदनशीलतेने सोडवाव्यात, असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिली. मुदतपूर्व पीक पाहणी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे अमरावती महसूल विभागातील पीक स्थिती आढावा बैठकीत ते बोलत होते. कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक, विभागीय आयुक्त नयना गुंडे, कृषी आयुक्त परिमल सिंह, विभागातील खासदार, आमदार, पाचही जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व व विविध विभ...

आधार नोंदणीच्या माध्यमातून हरविलेल्या बालकाचे कुटुंब शोधण्यात यश

इमेज
      आधार नोंदणीच्या माध्यमातून हरविलेल्या बालकाचे कुटुंब शोधण्यात यश   अकोला , दि. १७   : जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे तसेच आधार नोंदणी प्रक्रियेचा प्रभावी वापर करून एका हरविलेल्या बालकाचा शोध घेऊन त्याच्या कुटुंबाचा शोध लावण्यात यश आले. दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी अकोला रेल्वे स्थानकावर रेल्वे चाइल्ड हेल्पलाईनचे कर्मचारी रेल्वेमध्ये पालकांविना प्रवास करणाऱ्या बालकांच्या शोधासाठी क्षेत्रीय कार्य करत असताना एक १६ वर्षीय बालक आढळून आला. बाल कल्याण समिती , अकोला यांच्या आदेशानुसार सदर बालकास शासकीय बालगृह , अकोला येथे दाखल करण्यात आले.   सदर बालक स्वतःबाबत विविध राज्यांतील पत्ते सांगत होता. त्याच्याकडील पिशवीची तपासणी केली असता अहमदाबाद येथील एका रुग्णालयाची वैद्यकीय फाईल आढळून आली. मात्र , या फाईलवर बालकाचा कोणताही पत्ता नमूद नव्हता. तसेच त्याच्याकडे रणीवाडा ते अहमदाबाद असे रेल्वेचे तिकीट आढळून आले. रणीवाडा हे राजस्थान राज्यात असून रुग्णालय गुजरात राज्यातील अहमदाबा देतील होते. बालक स्वतः बिहार तसेच दिल्ली येथील असल्याचे ...

अकोल्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; ४.१५ लाखांचे ५९३ किलो कालबाह्य तूप जप्त, दोन दुकानांचे परवाने निलंबित

      अकोल्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई ; ४.१५ लाखांचे ५९३ किलो कालबाह्य तूप जप्त , दोन दुकानांचे परवाने निलंबित   अकोला, दि. १७ : शहरातील खाद्य आस्थापनांची अन्न व औषध प्रशासनाने   दोन दिवसीय विशेष तपासणी मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. अकोला शहरातील दोन नामांकित फर्म्समध्ये विक्रीसाठी ठेवलेला तब्बल ५९३ किलो कालबाह्य     तुपाचा साठा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत ४ , १५ , ०९३ रुपये आहे. या गंभीर निष्काळजीपणाबद्दल दोन्ही आस्थापनांचे अन्न परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत. एफडीएचे सहआयुक्त दे. गो. वीर यांनी दिलेल्या माहितीनुसार , १६ आणि १७ सप्टेंबर २०२६ रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने शहरातील विविध खाद्य प्रतिष्ठानांची तपासणी केली. त्यात पू र्वा मार्केटिंग येथील तपासणीत येथे १५ वेगवेगळ्या प्रकारच्या कालबाह्य तुपाचा साठा आढळून आला. प्रशासनाने ४५८ किलो तूप जप्त केले असून त्याची अंदाजे किंमत ३ , ३४ , ०९३ रुपये आहे.   मेसर्स लीलाधर जगजीवन येथे १७ सप्टेंबर रोजी या फर्मवर छापा टाकण्यात आ...

सेवा संकल्प अभियानात मानवी रांगोळी दीड हजारहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

इमेज
 सेवा संकल्प अभियानात मानवी रांगोळी दीड हजारहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग अकोला, दि. १७ : सेवा संकल्प अभियानाचा उत्साहात शुभारंभ अकोला येथे झाला असून, लालबहादूर शास्त्री क्रीडांगणात मानवी रांगोळी साकारण्यात आली. त्यात शहरातील विविध शाळांचे दीड हजारहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर  या कालावधीत जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनात व जिल्हास्तरीय नोडल अधिकारी आरडीसी गजेंद्र मालठाणे यांच्या नियोजनात विविध उपक्रमांनी अभियानाचा जिल्ह्यात शुभारंभ आज झाला. जिल्हा क्रीडा कार्यालय व मनपा शिक्षण विभागाच्या सहकार्याने लालबहादूर शास्त्री क्रीडांगणावर विद्यार्थ्यांच्या सहभागासह महाराष्ट्राचा नकाशा साकारण्यात आला. त्यासमोर ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ असे रेखाटलेली रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. महापालिकेच्या शाळांचे दीड हजारहून अधिक विद्यार्थी उपक्रमात सहभागी झाले. भारतमातेचा जयघोष, मुलांचा उत्साह, जल्लोषाने आसमंत निनादून गेले होते.  जिल्हा क्र...

रविवारपासून कृषि विद्यापीठात खरीप शिवार फेरी! कृषि मंत्री मा. ना. दत्तात्रय भरणे यांचे शुभहस्ते संपन्न होणार उदघाटन!

 रविवारपासून कृषि विद्यापीठात खरीप शिवार फेरी! कृषि मंत्री मा. ना. दत्तात्रय भरणे यांचे शुभहस्ते संपन्न होणार उदघाटन! विद्यापीठ स्थापना दिनाचे औचित्य साधत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन तथा प्रकल्प संचालक आत्मा, महाराष्ट्र राज्य यांचे संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे आयोजित तीन दिवसीय खरीप शिवार फेरीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे प्रतिकूलपती मा. ना.दत्तात्रय भरणे यांचे  शुभहस्ते रविवार दिनांक 20 सप्टेबर 2026 रोजी सकाळी ठीक 11:00 वाजता संपन्न होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. ॲड. आकाश फुंडकर यांचे अध्यक्षतेत संपन्न होणाऱ्या या  उद्घाटन सत्राचे प्रसंगी, महाराष्ट्र राज्याचे कृषि राज्यमंत्री मा.ना.ॲड. आशिष जयस्वाल विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी महाराष्ट्र विधानसभा विधिमंडळ पक्ष मुख्य प्रतोद (मंत्री दर्जा) मा.आ. रणधीर सावरकर, अकोला शहराच्या प्रथम नागरिक महापौर सौ. शारदा खेडकर, अकोला जिल्ह्याचे युवा खासदार मा....

सेवा संकल्प अभियान अनाथांना प्रमाणपत्रांचे वितरण

इमेज
      सेवा संकल्प अभियान अनाथांना प्रमाणपत्रांचे वितरण अकोला, दि. १७ : सेवा संकल्प अभियानाच्या अनुषंगाने महिला व बालविकास विभागातर्फे जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सहकार्याने अनाथ प्रमाणपत्रांचे वितरण आज झाले.   जिल्हा बालकल्याण समितीच्या अध्यक्ष ॲड. अनिता गुरव अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार , जिल्हा महिला व बालविकास अधिकारी लक्ष्मण हगवणे , जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडूलकर , सुनील लाडुलकर यांच्यासह बाल कल्याण समितीच्या सदस्य प्रांजली जैस्वाल , सचिन घाटे , सुनील सरकटे , वैभव भदे , राजेश मनवर तसेच   राजेश देशमुख   आदी यावेळी उपस्थित होते.   अनाथ बालकांना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये १ टक्के समांतर आरक्षणाचा आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अनाथ प्रमाणपत्रांचे वितरण केले जाते . सेवा संकल्प अभियानात गरजूंपर्यंत पोहोचून आवश्यक प्रमाणपत्रांचे वितरण केले जात आहे, असे ॲड. गुरव यांनी सांगितले. श्री. पवार यांनी सेवा संकल्प अभियानातील उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व ...

सेवा संकल्प अभियान प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना टुल किटचे वितरण आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल खासदार अनुप धोत्रे

इमेज
  सेवा संकल्प अभियान प्रधानमंत्री विश्वकर्मा योज नेच्या लाभार्थ्यांना टुल किटचे वितरण आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल खासदार अनुप धोत्रे अकोला, दि. १७ : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना पारंपरिक कारागिरांच्या हाताला बळ देणारी व आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल घडवणारी महत्वपूर्ण योजना आहे , असे प्रतिपादन खासदार अनुप धोत्रे यांनी आज येथे केले.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त सेवा संकल्प अभियानात प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना टूल किट व प्रमाणपत्रांचे वितरण जिल्हाधिकारी कार्यालयात झाले. खासदार अनुप धोत्रे , आमदार वसंत खंडेलवाल , महापौर शारदा खेडकर , जयंत म्हसने , जिल्हाधिकारी वर्षा मीना , जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्राजक्ता खोटरे , विश्वकर्मा समितीचे सदस्य श्री. अंधारे , श्री. खरप आदी उपस्थित होते.   योजनेत टूल वितरण , कर्जाची सुविधा , प्रमाणपत्र, ओळखपत्र, प्रशिक्षण दिले जाते. पारंपरिक कारागीर आणि शिल्पकारांसाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे . त्यामुळे पारंपरिक कौशल्याला प्रोत्साहन मिळून आर्थिक सक्षमीकरण वाढेल. ...

गणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी ‘लोकसंवाद’ अभियान ; आजपासून अकोला जिल्ह्यात उपक्रमास सुरुवात ; विविध कल्याणकारी योजनांची मिळणार माहिती

  गणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी ‘ लोकसंवाद’ अभियान   आजपासून अकोला जिल्ह्यात उपक्रमास सुरुवात ;     विविध कल्याणकारी योजनांची मिळणार माहिती          अकोला , दि . 16 : महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील लोकसहभागाचा महत्त्वाचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना , उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागांतर्गत असलेल्या जिल्हा माहिती कार्यालय अकोला आजपासून ‘ लोकसंवाद -2026’ हा विशेष जनजागृती उपक्रम शहरातील शास्त्रीनगर व विप्र युवा वाहिनी गणेशोत्सव मंडळापासून प्रारंभ करीत आहे .            राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘ राज्य महोत्सव ’ म्हणून घोषित केले असून , या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येणाऱ्या गणेश मंडळाच्या ठिकाणी लोकसंवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे .   शासनाच्या योजनांची ...