समाज कल्याण कार्यालयात जेष्ठ नागरिक दिन साजरा
अकोला, दि. 7 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याणतर्फे जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना निमंत्रित करून ज्येष्ठ नागरिक दिन नुकताच साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाकरिता जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी जिल्हा समन्वय समितीचे अशासकीय सदस्य नारायणराव अंधारे उपस्थित होते व प्रमुख अतिथी जिल्हा समन्वय समिताचे उपाध्यक्ष ना.मा.मोहोड, विनायक पांडे, चंद्रकांत कुळकर्णी, प्रा.डॉ. सत्यनारायण बाहेती, रमेश बाहेती, तुळशिराम बोबडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रज्ञा खंडारे यांनी व प्रास्ताविक विनोद शिरसाट यांनी ज्येष्ठ नागरिक कायदा 2007 बाबत माहिती सांगितली. या कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवर यांनी ज्येष्ठ नागरिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ता म्हणून पातुर येथील आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्रा.डॉ. सुनिता कदम यांनी आहार पध्दती विषयी तसेच आयुर्वेदाविषयी विश्लेषनात्मक माहिती दिली. कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांची जिल्हा शासकीय रुग्णालय येथील शल्यचिकित्सक डॉ.अशोक जाधव, दंत शल्यचिकित्सक डॉ.अदिती साख्रीकर, फिजीशीयन डॉ. श्रेया अग्रवाल आणि त्यांच्या पथकामार्फत मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली व उपस्थित ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या व आरोग्य विषयक घ्यावयाची काळजी बाबत मार्गदर्शन केले. समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त एम.जी.वाठ यांनी ज्येष्ठ नागरिक कायदा 2007 मधील तरतुदी तसेच धोरणाविषयी माहिती दिली. शासनाच्या विविध विभागाच्या तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सोई-सुविधांविषयी माहिती देण्यात आली. सदर विभागाने नव्याने सुरू करण्यात आलेल्या तसेच यापुर्वी सुरू करण्यात आलेल्या सर्व योजनांचा जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. तसेच विविध बाबींविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सर्व जेष्ठ नागरिकांना जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा