पं. स. सभापती पदाचे आरक्षण सोडतीद्वारे निश्चित
पं. स. सभापती पदाचे आरक्षण सोडतीद्वारे निश्चित
अकोला, दि. ९ : जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती पदाच्या आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या उपस्थितीत नियोजनभवनात आज काढण्यात आली.
सोडतीनुसार पंचायत समितीनिहाय आरक्षण : बाळापूर - अनुसुचित जाती, अकोला - अनुसुचित जाती महिला, तेल्हारा - अनुसुचित जमाती महिला, अकोट- नागरिकांचा मागास प्रवर्ग, पातुर - सर्वसाधारण महिला, बार्शीटाकळी-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, मुर्तिजापुर- सर्वसाधारण.
निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा