शासकीय आदिवासी आश्रम शाळेत शिक्षकांच्या रिक्त जागा बाह्यस्रोताद्वारे भरणार

 

शासकीय आदिवासी आश्रम शाळेत

शिक्षकांच्या रिक्त जागा बाह्यस्रोताद्वारे भरणार

अकोला, दि. १७ : आदिवासी विकास आयुक्तांच्या आदेशान्वये शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांची रिक्त असलेली पदे तात्पुरत्या स्वरुपात भरण्याबाबत वाह्यस्रोताद्वारे भरण्यात येत आहेत.

त्यासाठी मे. छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था आणि मे, महाराष्ट्र विकास ग्रुप या संस्थांना आदेश देण्यात आला आहे. या संस्थांमार्फत शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत आहे. या संस्थांमार्फत शासकीय आश्रमशाळेवर याआधी नियुक्ती देण्यात आलेल्या शिक्षकांपैकी काही शिक्षक हे अद्याप शाळेवर हजर झाले नाहीत.

त्यामुळे अकोला, वाशिम व बुलढाणा या कार्यक्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त पदांचा आढावा घेण्यात आला. जे शिक्षक अद्याप हजर झालेले नाहीत त्या जागांचा विचार करून विषयानुसार रिक्त जागांनुसार पुन्हा अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांना दि. 20 ते दि. 31 ऑक्टोबर दरम्यान ऑनलाईन अर्ज करता येतील. इच्छूकांनी एमव्हीजीकंपनी.इन या संकेतस्थळावर (https://mvgcompany.in) अर्ज दाखल करावेत, असे आवाहन आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मोहनकुमार व्यवहारे यांनी केले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत भरघोस अनुदान शेतक-यांनी लाभ घ्यावा – जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी