अकोल्याचा शाश्वत ठरला राज्यात सर्वोत्कृष्ट मुष्टियोद्धा
अकोल्याचा शाश्वत ठरला राज्यात सर्वोत्कृष्ट मुष्टियोद्धा
अकोला, दि. १ : नेहुली येथे नुकत्याच झालेल्या शालेय राज्यस्तरीय मुष्टियुद्ध
स्पर्धेत अकोल्याचा शाश्वत महल्ले सुवर्णपदक मिळवून सर्वोत्कृष्ट मुष्टियोद्धा ठरला.
अलिबाग जिल्ह्यातील नेहुली येथे दि. २५ ते २८ सप्टेंबर दरम्यान शालेय
राज्यस्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धा झाली, त्यात अकोला क्रीडा प्रबोधिनी व जिल्हा क्रीडा
प्रशिक्षण केंद्रांच्या खेळाडूंनी ८ सुवर्ण, २ रौप्य व ८ कांस्य अशी तब्बल १८ पदके
पटकावली. क्रीडा प्रबोधिनीचा शाश्वत महल्ले सुवर्णपदक मिळवून सर्वोत्कृष्ट मुष्टियोद्धा
पुरस्काराचा मानकरी ठरला.
स्पर्धेत गोपाळ गणेशे, हर्षदीप जाधव, अथर्व भट यांना सुवर्णपदक मिळाले.
करण माळी, शिवराज देशमुख, स्मित राजपूत, बख्तियार बेहरेवाले यांनी कांस्यपदक मिळवले.
मुलींमध्ये इशिका झांबरे, गार्गी राऊत, अक्षरा खंडारे,भक्ती कावळे यांनी सुवर्णपदक,
मोक्षदा राऊत, श्रद्धा लांडे यांनी रजतपदक,
तसेच सुहानी बोराडे, चैताली एरंडे, श्रावणी चंदन, श्रावणी डोसे यांनी कांस्यपदक मिळवले.
या यशाबद्दल जिल्हाधिकारी वर्षा मीना, क्रीडा उपसंचालक गणेशराव जाधव,
सहायक संचालक सुधीर मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट, प्रशिक्षक आदित्य मने,
योगेश निषाद, गजानन कबीर, सय्यद साद, स्नेहा वणवे आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा