मूर्तिजापूर येथे कार्यशाळेत बाल संरक्षणाबाबत मार्गदर्शन




 

मूर्तिजापूर येथे कार्यशाळेत बाल संरक्षणाबाबत मार्गदर्शन

अकोला, दि. १ :  महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था व राज्य बाल संरक्षण संस्थेतर्फे मुर्तिजापुर येथे तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका, आशा सेविका, पोलीस पाटील यांची बाल संरक्षण मार्गदर्शन कार्यशाळा सोमवारी झाली.

जिल्हा कार्यक्रम अधिकारी राजश्री कौलखेडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य अॅड. संजय सेंगर, ना. तहसीलदार गिरीजा लोखंडे, अमित रायबोले, सुजल देशमुख, अनिल राऊत, संतोष चक्रनारायण उपस्थित होते.

अॅड. संजय सेंगर यांनी सोप्या भाषेत सर्वांना समजेल अशा शब्दांत बाललैंगिक अत्याचार अधिनीयम २०१२ व बालविवाह अधिनीयम २००६,  जे.जे. ॲक्ट 2015, बालकांची काळजी व संरक्षण या विषयावर प्रकाश टाकला. प्रशिक्षक संतोष चक्रनारायण यांनी प्रशिक्षणार्थीना बालस्नेही ग्रामपंचायत, सक्षम बालक, बालकांचे हक्क व सुरक्षितता या विषयाची मांडणी केली. अनिल राऊत यांनी बालभिक्षेकरी, व्यसनमुक्ती, बालमजुरीयाबाबत प्रशिक्षण दिले. ग्राम बाल संरक्षण समितीचे कार्य व रचना समुपदेशक शरद तळेगावकर यांनी सांगितली.

 

गिरीश पुसदकर  जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अकोला यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन सौ.शरयू जयंत तळेगावकर चाईल्ड लाईन समुपदेशक  यांनी केले. आभार जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडूलकर  यांनी मानले.  जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड लाईन,ॲसेस टु.जस्टीस प्रकल्प अकोला, सुखाय  फाउंडेशन, तीक्ष्णगत संस्था, विपला फाउंडेशन  येथील अधिकारी व कर्मचारी यांनी कष्ट घेतले.

०००

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका