फलोत्पादन अभियानाच्या लाभासाठी अर्ज करा कृषी विभागाचे आवाहन
फलोत्पादन अभियानाच्या लाभासाठी अर्ज करा
कृषी विभागाचे आवाहन
अकोला, दि. ८ : कृषी समृध्दी योजनेत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात
४५.७२ लक्ष रू. लक्ष्यांक असून, विविध घटकांसाठी लाभ दिला जाणार आहे. शेतकरी बांधवांनी
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.
योजनेत क्षेत्र विस्तार फुल शेती, मसाला पिके, विदेशी फळपिक आदी, जुन्या
फळबागांचे पुनरुज्जीवन, मधुमक्षिका पालन, आळिंब उत्पादन केंद्र, सामुहिक शेततळे, शेततळे
अस्तरीकरण, शेडनेट हाऊस, पॉली हाऊस, प्लास्टीक मल्चींग, पॅक हाऊस, कांदाचाळ, फलोत्पादन
यांत्रिकीकरण तसेच शीतगृह, शीतखोली, प्राथमिक प्रक्रीया केंद्र, एकात्मीक पॅक हाऊस,
रेफर व्हॅन व रायपनिंग चेंबर इत्यादी प्रकल्प आधारीत घटकांचा समावेश आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२५-२६ कार्यक्रमांतर्गत राबविण्यात
येणाऱ्या वरील घटकाचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashtra.gov.in
या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली, अर्ज करावेत. योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत
जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा. योजनेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी
यांचेशी संपर्क करावा.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा