शासकीय आयटीआय अकोला येथे अल्पमुदतीच्या नाविन्यपूर्ण आणि स्वयंरोजगारास पूरक अभ्यासक्रमांना अधिकाधिक संख्येने प्रवेश घ्यावा..-प्राचार्य संतोष साळुंके यांचे आवाहन

 


 पंतप्रधानांच्या  हस्ते  ८तारखेला आभासी पद्धतीने होणार उद्घाटन.

 अकोला दि.6 :  स्थानिक रतनलाल प्लॉट स्थित सम्राट चंद्रगुप्त मौर्य शासकीय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोला येथील अल्पमुदतीच्या विविध नाविन्यपूर्ण आणि स्वयंरोजगारास पूरक अशा  अभ्यासक्रमांचा शुभारंभ येत्या ८ ऑक्टोबर  रोजी  दुपारी ३ वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने होणार आहे. यावेळी संस्थेमध्ये स्थानिक जनप्रतिनिधी सुद्धा उपस्थित राहणार आहेत.

 या अभ्यासक्रमा करिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विविध समित्या त्याकरता युद्ध पातळीवर कार्यरत आहेत.
 संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंके यांनी या अभ्यासक्रमाचा युवक युवती तथा इतर जे रोजगार आणि स्वयंरोजगार करू इच्छितात अशा सर्वांनी  आपले प्रवेश ऑनलाइन पद्धतीने  अर्ज दाखल करून  लाभ घ्यावा असे आव्हान केले आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया संस्थेमध्येच पार पाडल्या जात आहे.
 संस्थेचे शिल्पनिदेशक तथा प्रसिद्धी समिती प्रमुख अरविंद पोहरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवेश शुल्क सध्या फक्त शंभर रुपये ठेवण्यात आलेले असून १) सेल्फ एम्पलोयी टेलर २) सुईंग मशिन ऑपरेटर ३) फोर व्हीलर सर्विस टेक्निशियन ४) वेब डेव्हलपर ५) जूनियर सॉफ्टवेअर ऑपरेटर ६) इलेक्ट्रिक डोमेस्टिक सोल्युशन हे अल्पमुदत अभ्यासक्रम दिनांक  ८ऑक्टोबर पासून सुरू होणार आहेत तर सोलर पंप टेक्निशियन,सोलर पॅनल इंस्टॉलेशन टेक्निशियन, सोलर एलईडी टेक्निशियन,सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन टेक्निशियन, मोबाईल हार्डवेअर रिपेअर टेक्निशियन,  असिस्टंट प्लंबर जनरल हे इतर सहा अभ्यासक्रम पुढील महिन्यात सुरु होणार आहे.
 पंतप्रधानांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटन समारंभाला अधिकाधिक संख्येने प्रशिक्षणार्थी तसेच त्यांची पालकांनी व  नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंके यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका