बालगृहातील चिमुकल्यांसोबत दिवाळी साजरी करा स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांना आवाहन

 

बालगृहातील चिमुकल्यांसोबत दिवाळी साजरी करा

स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांना आवाहन

अकोला, दि. १७ : बालगृह, शिशुगृह, महिला राज्यगृहातील महिलाभगिनी व बालकांना दिवाळी सण साजरा करता यावा यासाठी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था तसेच, नागरिकांनी पुढाकार घेऊन त्यांच्यासमवेत दिवाळी सण साजरा करावा,  असे आवाहन महिला व बालविकास विभागाने केले आहे.

 बालगृह, राज्यगृहातील महिला, बालके व भिक्षेकरी यांना दिवाळी साजरा करता यावी यासाठी स्वयंसेवी संस्था, पुढारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी पुढाकार घेऊन त्यांच्यासोबत दिवाळी सण साजरा करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश  पुसदकर(8329904312), जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडूलकर (9421464566), शासकीय बालगृह आणि महिला राजगृह जयश्री वाढे (8208977522), गायत्री बालिकाश्रम वैशाली भारसाकळे(9881477573), सुर्यादय बालगृह शिवराज खंडाळकर (9028233077), उत्कर्ष शिशुगृह उमेश पाटील (9561608471) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडुलकर यांनी केले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत भरघोस अनुदान शेतक-यांनी लाभ घ्यावा – जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी