अनुसूचित जाती उमेदवारांसाठी उद्योजकता प्रशिक्षण
अनुसूचित जाती उमेदवारांसाठी
उद्योजकता प्रशिक्षण
अकोला, दि. 24 :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) व महाराष्ट्र उद्योजकता
विकास केंद्राद्वारे अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील युवक व युवतींसाठी एक महिना
कालावधीचे विनामूल्य उद्योजकता विकास प्रशिक्षण आयोजिण्यात आले आहे.
या शिबिराचा सुरूवात दि. ३० ऑक्टोबरला होऊन ते दि. २९ नोव्हेंबरला पूर्ण होईल. अनुसूचित
जातीतील युवक-युवती, नवउद्योजकांना उद्योजकता विकासासंबंधी
प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःचा उद्योग
व्यवसाय - स्वयंरोजगार निर्माण करण्यास प्रवृत्त करणे हा कार्यक्रमाचा उद्देश
आहे. अनिवासी स्वरुपाच्या या
प्रशिक्षण कार्यक्रमामधून सहभागी प्रशिक्षणार्थींना उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास,
विविध क्षेत्रातील उद्योगसंधी, उद्योगाची
निवड आदींचे प्रशिक्षण
मिळेल.
त्याचप्रमाणे, उद्योग
उभारणी व व्यवस्थापन ,बाजारपेठ पाहणी व व्यवस्थापन, उद्योग व्यवसायाशी निगडीत कायदे व अंमलबजावणी
कार्यपद्धती , उद्योग आधार नोंदणी ,
शासकीय विविध कर्ज योजना-सोयी सवलती आणि कार्यप्रणाली ,
सिद्धी प्रेरणा प्रशिक्षण,
उत्पादनाच्या किंमती , हिशोब पध्दती ,
प्रकल्प अहवाल तयार करणे ,
उद्योजकांचे अनुभव कथन ,उद्योगांना
प्रत्यक्ष भेटी , डिजिटल मार्केटिंग तसेच
उद्योगाचे वित्तीय व्यवस्थापन याविषयी
तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे .
किमान इयत्ता
आठवी उत्तीर्णांना प्रवेश मिळू शकेल. वयोमर्यादा १८ ते ४५ आहे. जातीचे प्रमाणपत्र आवश्यक. आधारपत्र,
पॅनकार्ड, शाळा
सोडण्याचा दाखला, गुणपत्रिका, छायाचित्रे आदी
कागदपत्रे घेऊन दि. २७ ऑक्टोबरला दु. २ वाजेपर्यंत महाराष्ट्र उद्योजकता विकास
केंद्र द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, शुक्ल सदन, दुर्गा चौक, अकोला येथे हजर
राहावे. दुपारी २ वाजता मुलाखती घेऊन प्रशिक्षणार्थीची निवड करण्यात येणार आहे अधिक
माहितीकरिता प्रसन्न रत्नपारखी, प्रकल्प अधिकारी, एमसीईडी व विजय बेदरकर, प्रकल्प अधिकारी, बार्टी, अकोला यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय अधिकारी किशोर अंभोरे व उद्योग महाव्यवस्थापक
संतोष बनसोड यांनी एक
पत्रकाद्वारे सांगितले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा