सैनिक कल्याण विभागात लिपिकांची 72 पदे भरणार

 

सैनिक कल्याण विभागात लिपिकांची 72 पदे भरणार

अकोला दि. 14 : सैनिक कल्याण विभागातर्फे माजी सैनिकांमधून लिपिक- टंकलेखकांची 72 पदे भरण्यात येत असून, दि. 5 नोव्हेंबरपूर्वी ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंद शरद पाथरकर यांनी केले आहे.

 

या भरतीसाठी केवळ माजी सैनिक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती प्रक्रिया टीसीएस-आयओएन यांच्यामार्फत होणार आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सैनिक कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर (महासैनिक.महाराष्ट्र.जीओव्ही.इन) दि. १४ ऑक्टोबरपासून दि. ५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी २३.५९ वाजेपर्यंत सादर करावेत.

जिल्ह्यातील पात्र आणि इच्छुक माजी सैनिकांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मे. पाथरकर यांनी केले आहे.

 ०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका