भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

 

अकोला, दि. 10 : भारतीय सैन्यदल, नौदल, व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्विस सिलेक्शन बोर्ड या परीक्षेची पुर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व युवतीसाठी दि. ०३ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत एसएसबी कोर्स क्र- ६३ आयोजित करण्यात येत आहे. सदर कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन, आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात आली आहे.
अकोला जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदांची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अकोला येथे दि. २९ ऑक्टो २०२५ रोजी मुलाखतीस हजर राहावे. मुलाखतीस येतेवेळी उमेदवारांनी सैनिक कल्याण विभाग (डीएसडब्लु), पुणे यांची वेबसाईट www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर सर्च करून त्यामधील एसएसबी - ६३ कोर्सेसाठी किंवा व्हाटसॲप क्र- ९१५६०७३३०६ वर संबंधित प्रवेश पत्र व परिशिष्टांची चेक लिस्ट यांचे अवलोकन करून त्याची दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून (किंवा प्रिंट कार्यालयाकडून घ्यावी) ते पुर्ण भरून सोबत घेऊन यावे. केंद्रामध्ये एसएसबी कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना सोबत घेवून यावेत.
कंम्बाईड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (सीडीएसई -युपीएससी) अथवा नॅशनल डिफेंस अॅकेडमी एक्झामिनेशन (एनडीए-युपीएससी) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी "सी" सर्टिफिकेट 'ए' किंवा 'बी' ग्रेड मध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. युनिर्वसिटी एन्ट्री स्किमसाठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्या ईमेल आईडी- training.pctcnashik@gmail.com व दुरध्वनी क्र. ०२५३-२४५१०३२ किंवा व्हाटसॲप क्र- ९१५६०७३३०६ वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा निवृत्त सैनिक कल्याण अधिकारी मेजर आनंद शरद पाथरकर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका