जिल्हाधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन





 

 

जिल्हाधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन

     अकोला, दि. 15: भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिवसानिमित्त ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले. त्याला अधिकारी व कर्मचा-यांसह नागरिकांचाही मोठा प्रतिसाद लाभला.  

      माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस 15 ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी वाचन प्रेरणा दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यानुषंगाने जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती ग्रंथालय अधिकारी अतुल वानखडे यांनी दिली. प्रारंभी माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका