गोरेगाव निवासी शाळा विभागीय स्तरावर द्वितीय
अकोला, दि. 10 : महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभागांतर्गत अनुसुचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा गोरेगाव, खुर्द येथील विद्यार्थींनी राष्ट्रीय लोकसंख्या प्रकल्प 2025-26 अन्वये विभागस्तरीय शिक्षण व प्रशिक्षण संस्था मालटेकडीजवळ, टोपे नगर, अमरावती येथे झालेल्या भूमिका अभिनय स्पर्धेमध्ये विद्यार्थीनीने द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे. याकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सर्वच स्तरातून विद्यार्थीनीचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
00000000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा