अमली पदार्थ प्रतिबंध समन्वय समितीची बैठक तपासण्यांचे प्रमाण वाढवा - जिल्हाधिकारी वर्षा मीना
अमली पदार्थ प्रतिबंध समन्वय समितीची बैठक
तपासण्यांचे प्रमाण वाढवा
-
जिल्हाधिकारी
वर्षा मीना
अकोला, दि. २८ : जिल्ह्यात अमली
पदार्थांची वाहतूक, विक्री होऊ नये यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे, तसेच
तपासण्यांचे प्रमाण वाढवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले.
जिल्हा अमली पदार्थ प्रतिबंध समन्वय समितीच्या बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात
झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक सीमा झावरे, उपवनसंरक्षक
नम्रता ताले, सहायक आयुक्त संतोष पोवराज, समाजकल्याण सहायक आयुक्त मारोती वाठ यांच्यासह
विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, जिल्ह्यात कुठेही अंमली पदार्थांची
वाहतूक, विक्री होता कामा नये यासाठी विविध विभागांकडून होणा-या वाहने, पार्सल, नाका
तपासणी, डॉग युनिटद्वारे रेल्वेगाड्यांची तपासणी आदी तपासण्यांत सातत्य ठेवावे. कोटपा
कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. भावी पिढीला व्यसनांपासून मुक्त ठेवण्यासाठी
योग्य माहितीचा प्रसार, तसेच संबंधित नियम, अधिनियमांची कठोर अंमलबजावणी होणे आवश्यक
आहे. त्यादृष्टीने समन्वयाने सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.
एनडीपीएस कायद्यांतर्गत यावर्षी आतापर्यंत 39 गुन्हे दाखल असून, 32
आरोपींना अटक करण्यात आली. त्यात 40 लक्ष 61 हजार रू. किमतीचा 209 किलो 835 ग्रॅम गांजा
जप्त करण्यात आला. इतर 17 लक्ष 34 हजार रू. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी
माहिती गृह विभागातर्फे देण्यात आली.
०००

.jpeg)

.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा