आयटीआयमध्ये अल्पकालीन अभ्यासक्रमांची सुरूवात
जिल्ह्यात १० संस्थांत अल्पकालीन अभ्यासक्रमांची सुरूवात
अकोला दि. 9 : सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्र माध्यमिक
शाळा तथा कनिष्ठ महाविद्यालय संस्थांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित अल्पकालीन
मुदतीचे अभ्यासक्रम सुरु करण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील
8 शासकीय औद्योगिक संस्था, तसेच 2 शासकीय तंत्र माध्यमिक शाळांमध्ये विविध अभ्यासक्रम
सुरू करण्यात आले आहेत.
तंत्रज्ञानाधिष्ठित कौशल्ययुक्त मनुष्यबळाची मागणी मोठ्या प्रमाणात
वाढत आहे. त्यामुळे युवकांना आधुनिक तंत्रज्ञान व सेवा क्षेत्राशी सुसंगत प्रशिक्षण
देऊन औद्योगिक क्षेत्रास आवश्यक कुशल मनुष्य बळ पुरविणे हा उपक्रमाचा उद्देश आहे. अधिकाधिक
युवकांनी प्रवेश घ्यावा. अधिक माहितीसाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय
तंत्र माध्यमिक शाळा यांच्याशी संपर्क साधावा. ‘एमएसबीएसव्हीईटी.इडीयु.इन’ या संकेतस्थळावर
नोंदणी करता येईल.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा