जिल्हा ग्रंथालयात अभिजात मराठी ग्रंथप्रदर्शन
जिल्हा ग्रंथालयात अभिजात मराठी ग्रंथप्रदर्शन
अकोला दि. 9 : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात अभिजात मराठी भाषा
दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले.
राज्य ग्रंथालय परिषदेचे सदस्य
प्रभाकरराव घुगे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष
शामरावजी वाहुरवाघ अध्यक्षस्थानी होते. जिल्हा ग्रंथालय अधिकारी अतुल वानखडे उपस्थित
होते,
श्री. घुगे यांनी मराठी भाषेचे महत्व, मराठी भाषेची अभिजातता आणि मराठी
भाषा संदर्भात विविध उपक्रम याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ग्रंथालय निरीक्षक राजेश
कोलते यांनी प्रास्ताविक केले. कैलास गव्हाळे यांनी आभार मानले.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा