प्रतिष्ठान योजनेची ग्रंथयादी संकेतस्थळावर उपलब्ध

 

प्रतिष्ठान योजनेची ग्रंथयादी संकेतस्थळावर उपलब्ध

अकोला दि. 9 : कोलकाता येथील राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान व राज्य शासनाच्या संयुक्त निधीतून 50 व्या ग्रंथभेट योजनेत सन २०२३ मध्ये प्रकाशित व संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथांपैकी राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमिती सदस्यांनी निवड केलेल्या १ हजार ३८८ ग्रंथांची यादी  ग्रंथालय संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर अवलोकनार्थ खुली ठेवण्यात आली आहे.

या ग्रंथ यादीतील ग्रंथ किमान २५ टक्के सूटदराने वितरीत करणे बंधनकारक आहे. या ग्रंथयादीतील कोणत्याही ग्रंथाबाबतची सुचना, हरकती, आक्षेप असल्यास दि. १५ ऑक्टोबर, २०२५ पर्यंत ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई - ४०० ००१ यांच्याकडे लेखी स्वरुपात कार्यालयीन वेळेत हस्तबटवड्याने वा पोस्टाने अथवा ई-मेल वर पाठवावेत. मुदतीनंतर प्राप्त सुचनांचा/हरकतींचा/आक्षेपांचा विचार केला जाणार नाही.

यादीत ग्रंथांचे नाव, लेखक, प्रकाशक व किंमत यामध्ये काही बदल असल्याचे निदर्शनास आणून दिल्यास स्वागतार्ह असेल, असे आवाहन प्र. ग्रंथालय संचालक,अशोक मा. गाडेकर यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा