बालगृहातील मुलांनी तयार केलेले आकाशकंदील, दिवे उपलब्ध महिला व बालविकास भवनात वस्तूंचे प्रदर्शन


बालगृहातील मुलांनी तयार केलेले आकाशकंदील, दिवे उपलब्ध

महिला व बालविकास भवनात वस्तूंचे प्रदर्शन

अकोला, दि. १६ : येथील बालगृहे, महिला राज्य गृह, शक्तीसदन येथील अनाथ, निराधार, निराश्रीत महिला व बालके यांनी तयार केलेल्या रंगीत दिवे, आकाश कंदील, पायपुसणे, सुगंधित उटणे, तोरणे, हार आदी वस्तुंचे विक्री प्रदर्शन महिला व बालविकास भवनाच्या परिसरात सुरू आहे.  

 

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन महिला व बालविकास उपायुक्त ए.आर.चौधरी यांच्या हस्ते बुधवारी झाले.  जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर, बाल हक्क संरक्षण आयोगाचे माजी सदस्य अॅड. संजय सेंगर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी राजश्री कोलखेडे, बाल कल्याण समिती अध्यक्ष अॅड. अनिता शिंदे, बाल कल्याण समिती सदस्य राजेश देशमुख, प्रांजली जैस्वाल, ॲड. शीला तोष्णीवाल, संध्या वानखडे, राजु लाडुलकर उपस्थित होते.

सूर्योदय बालगृह, गायत्री बालिकाश्रम, महिला राज्यगृह, शासकीय

बालगृह, समता संजीवनी शक्ती सदन केंद्र यांच्यातर्फे महिला व मुलांनी निर्माण केलेल्या सुंदर वस्तूंचे कक्ष प्रदर्शनात दि. १७ ऑक्टोबरपर्यंत सकाळी 10 ते 6 या वेळेत सर्वांसाठी खुले आहेत. अकोलेकरांनी  प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

०००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत भरघोस अनुदान शेतक-यांनी लाभ घ्यावा – जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी