शिष्यवृत्ती अर्जांची प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे आवाहन
अकोला दि. 7 : अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, राज्य शासनाच्या शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतीपूर्ती योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना निर्वाह भत्ता या योजना माहिती व तंत्रज्ञान विभाग महाराष्ट्र शासन यांनी विकसित केलल्या महाडिबीटी पोर्टल या प्रणालीदवारे ऑनलाईनरित्या राबविण्यात येत आहेत.
या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता महाडीबीटी पोर्टलवरून नवीन व नुतणीकरण या अर्जाची ऑनलाईन स्विकृती दि.30 जून 2025 पासून करण्यात आलेली आहे. शिष्यवृत्तीकरिता महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणे ही बाब विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रकियेचाच भाग असून सदर कार्यवाही संबंधित महाविद्यालयाने प्रवेश प्रक्रिया चालू असतांनाच पूर्ण करणे आवश्यक आहे.
तथापि अद्याप अनुसूचित जाती या प्रवर्गातील केवळ 2 हजार 339 अर्जच नोंदणीकृत झालेले आहे. करिता शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी भारत सरकार मॅट्रिकोत्तार शिष्यवृत्ती या योजनेचे अर्ज लवकरात लवकर भरावे. जेणेकरून मंजूर झालेल्या शिष्यवृत्तीच्या रकमेची अदायगीची पुढील प्रक्रिया करणे सोयीचे होईल, असे आवाहन मारोती वाठ, सहायक आयुक्त समाज कल्याण अकोला यांनी केले आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा