अवाजवी भाडे आकारल्यास बसमालकांवर कारवाई करणार परिवहन विभागाची मोहिम

 

अवाजवी भाडे आकारल्यास बसमालकांवर कारवाई करणार

परिवहन विभागाची मोहिम

अकोला, दि. १५ : दिवाळी सणाला गावी जाणा-या प्रवाश्यांची गर्दी पाहून अवाजवी भाडे आकारणा-या खासगी बसमालकांवर कारवाईसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मोहिम हाती घेतली आहे.

दिवाळी सणानिमित्त बऱ्याच प्रमाणात नागरिक आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आणि सणानिमित्त आपल्या गावी जाण्यासाठी खासगी मोटारींनी प्रवास करीत असतात. अशावेळी खासगी प्रवाशी बस ऑपरेटर आणि ऑनलाईन तिकिट बुकिंगवाले यांच्याकडुन तिकीट दरांमध्ये वाढ केली जाते. यामुळे नागरिकांचे आर्थिक शोषण तर होतेच परंतु ज्या नागरिकांना अशा वाढीव दरांमुळे प्रवास परवडत नाही व त्यांची गैरसोय होते असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कार्यालयाची ही मोहिम दि. ३ नोव्हेंबरपर्यंत राबविण्यात येत असून, खासगी प्रवासी बसगाड्यांची तपासणी व भाडे आकारणी आदी बाबी तपासण्यात येणार आहेत.

 

      खासगी बसचालकांनी शासन निर्णयानुसार आपल्या बसचे भाडे हे राज्य परिवहन बस भाड्यापेक्षा 1.5 पटीपेक्षा अधिक आकारु नये. तपासणीमध्ये असे आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल. वाहनांची सखोल तपासणी करण्यात येऊन मोटार वाहन कायदा व त्याअंतर्गत असलेल्या नियमानुसार वाहनावर कडक कारवाई करण्यात येईल याची सर्व खाजगी बस संचालक यांनी नोंद घ्यावी.

      सणासुदीच्या काळात शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे खासगी बसचे भाडे हे राज्य मार्ग परिवहन बसच्या 1.5 पट पर्यंत वाढवण्याची बस मालकांना परवानगी आहे .परंतु कुणी खासगी बस ऑपरेटर प्रवाशांकडुन राज्य परिवहन बसच्या भाड्याच्या 1.5 पटीपेक्षा  अधिक भाडे घेत असेल तर प्रवाशांकडुन जेवढे भाडे घेतले असेल तेवढ्या रकमेच्या तिकीटाची प्रवाशांनी मागणी करावी. त्याआधारे  परिवहन कार्यालयाच्या ई-मेल आयडी dyrto.30-mh@gov.in यावर तक्रार करता येईल. अशा खाजगी  बसेसवर मोटार वाहन कायदा व त्याअंतर्गत असलेल्या नियमांनुसार कारवाई करण्यात येईल, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी केले.

०००

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत भरघोस अनुदान शेतक-यांनी लाभ घ्यावा – जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी