जि. प. व पं. स. निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिका-यांच्या नियुक्त्या

 जि. प. व पं. स. निवडणूकीच्या अनुषंगाने                                                             

 निवडणूक निर्णय अधिका-यांच्या नियुक्त्या

अकोला, दि. 15: जि. प. व पं. स. निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात पंचायत समितीनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. 

जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी याबाबतचा आदेश जारी केला. पातूर पंचायत समिती क्षेत्रासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी जोगेंद्र कट्यारे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार डॉ. राहूल वानखडे, अकोटसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर व सहायक अधिकारी म्हणून तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण, तसेच मूर्तिजापूरसाठी उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपकुमार अपार व तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. 


अकोला पं. स. क्षेत्रात उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे हे निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार सुरेश कव्हळे हे सहा. नि. नि. अधिकारी असतील. बाळापूर क्षेत्रासाठी उपजिल्हाधिकारी निखिल खेमनार व सहायक अधिकारी म्हणून वैभव फरतारे, बार्शिटाकळीसाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, तहसीलदार राजेश वझिरे व तेल्हा-यासाठी सहायक अधिकारी म्हणून तहसीलदार समाधान सोनवणे यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत भरघोस अनुदान शेतक-यांनी लाभ घ्यावा – जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी