जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पूरग्रस्तांसाठी २२ लक्ष २१ हजार रु. ची मदत
बँकेच्या या योगदानाबद्दल जिल्हाधिकारी वर्षा मीना व जिल्हा प्रशासन यांनी बँकेचे आभार मानले आहेत.
महाराष्ट्रात अलिकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे गंभीर पुररिस्थती निर्माण झाली आहे. या आपत्तीमध्ये अनेक संसार उधवस्त झाले असून, घरे, शेती, जनावरे व उपजिविकेची साधने वाहून गेली आहेत. तसेच हजारो कुटूंब बेघर होवून निवाऱ्याशिवाय राहत आहेत.
ही उद्भवलेली भीषण परिस्तिथि विचारात घेता, आपतग्रस्तांना मदत करण्यासाठी प्रशासनाच्या आवाहनास अनुसरून बँकेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत देत असल्याचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एल. वैद्य यांनी नमूद केले आहे.
बँकेकडून पूरग्रस्तांसाठी २२ लक्ष २१ हजार रु. ची मदत डीडीद्वारे मुख्यमंत्री सहाय्यक कक्षाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा