पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

  अकोला , दि. 31 :   जिल्ह्यातील नगरपरिषद अकोट ,  मुर्तिजापुर ,  बाळापूर ,  तेल्हारा ,  हिवरखेड आणि नगरपंचायत बार्शिटाकळी यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी अंतिम मतदार याद्या संबंधित नगरपरिषद व नगरपंचायत कार्यालयांच्या सूचना फलकांवर ,  त्यांच्या वेबसाईटवर ,  तसेच जिल्हाधिकारी अकोला यांच्या अधिकृत संकेतस्थळावर ( akola.nic.in )  दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात  आली आहे, अशी माहिती नपाप्रचे सह आयुक्त यांनी दिली.

अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान

    अकोला, दि. 30 :  राज्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शासनमान्य खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे. अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या संबंधित संस्था व शाळांनी सदर शासन निर्णयानुसार परिपूर्ण प्रस्ताव दि. 14 नोव्हेंबर जिल्हा नियोजन समिती, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला या कार्यालयास मिळतील या बेताने सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही. तसेच शासन निर्णयानुसार अनुदानासाठी पात्र नसतांना प्रस्ताव सादर करण्यात येऊ नये, असे कळविण्यात आले आहे.  . ०००

स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

  अकोला, दि. 30 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या परंतु वसतीगृहातील विद्यार्थी क्षमतेअभावी शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनु.जाती व नवबौध्द प्रवर्गातील इयत्ता ११ वी व १२ वी  नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेशीत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांचे आधार संलग्नी बँक खात्यामध्ये थेट जमा करण्याकरिता शासन निर्णय दि. ६ जाने २०१७ अन्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजना सुरू केलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी  सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांकरिता होस्टल मॅनेजमेंट सिस्टीम या साईडवर  https://hmasscrutinyworkflow. mahait.org/  ऑनलाईन अर्ज करावयाचे आहे. या योजनेच्या लाभाकरीता सदर अर्ज सादर करताना अभ्यासक्रमाचे प्रथम वर्षाकरिता विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे शासकीय वसतीगृहासाठी प्रथम वर्षाचा अर्ज ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. सदर अर्ज पात्र असल्यास व शा...

सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त भव्य पदयात्रेचे आयोजन सर्व यंत्रणांनी समन्वयाने उपक्रम यशस्वी करा - जिल्हाधिकारी वर्षा मीना

इमेज
  सरदार वल्लभभाई पटेल   यांची   १५० वी   जयंती राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त भव्य पदयात्रेचे आयोजन सर्व यंत्रणांनी समन्वयाने उपक्रम यशस्वी करा -          जिल्हाधिकारी वर्षा मीना   अकोला, दि. २९ : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रीय एकता दिवस भव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे. यानिमित्त जिल्हास्तरीय पदयात्रेचे आयोजन होणार असून, सर्व यंत्रणांनी समन्वयाने हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना                                                                              ...

‘चला जाणूया नदीला’ मोहिमेच्या अंमलबजावणीची चर्चा मोहिमेत अधिकाधिक लोकसहभाग मिळवा - जिल्हाधिकारी वर्षा मीना

इमेज
    ‘चला जाणूया नदीला’ मोहिमेच्या अंमलबजावणीची चर्चा मोहिमेत अधिकाधिक लोकसहभाग मिळवा -          जिल्हाधिकारी वर्षा मीना अकोला, दि. 29 : नद्यांच्या पुनरूज्जीवनासाठी ‘चला जाणूया नदीला’ ही मोहिम अत्यंत महत्वपूर्ण आहे. मोहिमेच्या निकषांप्रमाणे निवड, नियोजन व प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे, सर्व यंत्रणांप्रमाणेच स्वयंसेवी संस्था, तसेच अधिकाधिक लोकसहभाग मिळवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले.       अभियानाच्या अनुषंगाने नियोजन व कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, सहायक वनसंरक्षक नम्रता ताले, तसेच वन विभाग, नियोजन विभाग आदी विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.   जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, नद्यांतील प्रदूषण, अतिक्रमण, उपसा आदी रोखून पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने हे काम अत्यंत महत्वपूर्ण असल्याने त्यादृष्टीने जिल्ह्यात कार्यवाहीला वेग द्यावा. अभियानाच्या अनुषंगाने का...

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत, मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली माहिती

 मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) मंगळवार, दि. 28 ऑक्टोबर 2025 अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना 11 हजार कोटींचे येत्या पंधरा दिवसांत वितरण:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत आठ हजार कोटी वितरीत, मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली माहिती मुंबई, दि. 28 : राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जवळपास 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यात आतापर्यंत 8 हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय वितरित करण्यात आले असून, याचा लाभ 40 लाख शेतकर्‍यांना होतो आहे. आणखी 11 हजार कोटी रुपये वितरित करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. ही मदत पुढच्या 15 दिवसांत शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. त्यांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी 11 हजार कोटी रुपये वितरीत करण्यास मान्यता देण्यात आल्याने...

फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे मुंबईत आयोजन

इमेज
  फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे मुंबईत आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा ·           १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजन ·           तीसहून अधिक देशांमधील अभ्यासक ,  पर्यावरण तज्ज्ञ ,  आणि धोरणकर्त्यांचा समावेश   मुंबई दि. २८ : वातावरणीय बदल आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात भारताचे नेतृत्व अधोरेखित करणारी मुंबई वातावरण सप्ताह -  ‘ मुंबई क्लायमेट वीक ’  ही जागतिक स्तरावरील परिषद पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबईत होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हा महत्त्वाकांक्षी उपक्रम ‘प्रोजेक्ट मुंबई’ या संस्थेच्या संकल्पनेतून साकारला जात असून महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात येणार आहे. मंत्रालयातील समिती कक्षात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री  फडणवीस यांनी या उपक्रमाची घोषणा केली. यावेळी पर्यावरण व वातावरणीय बद...

शिक्षक मतदारसंघ_ *मतदार नोंदणीचा अर्ज आता ऑनलाईन करता येणार* संबंधितांनी तत्काळ नोंदणी करून घ्यावी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे आवाहन

  शिक्षक मतदारसंघ_   *मतदार नोंदणीचा अर्ज आता ऑनलाईन करता येणार*  संबंधितांनी तत्काळ नोंदणी करून घ्यावी  जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे आवाहन  अकोला दि. २७ : शिक्षक मतदार संघासाठी 1.11.2025 अर्हता दिनांकावर आधारीत अमरावती विभाग शिक्षक मतदार मतदारसंघाच्‍या मतदारयाद्या नव्‍याने तयार करण्याचा नोंदणी कार्यक्रम सुरू आहे. मतदार नोंदणीसाठी अर्जाची सुविधा ऑनलाईन उपलब्‍ध असून, सर्व संबंधितांनी नोंदणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे.  भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1.11.2025 या अर्हता दिनांकावर आधारीत अमरावती विभागातील शिक्षक मतदार मतदारसंघात नव्‍याने मतदारयाद्या तयार करण्‍याचा कार्यक्रम घोषित केला आहे. मतदार यादी कार्यक्रमानूसार नमुना क्रमांक-19 व्‍दारे अर्ज स्‍वीकारण्‍याचा अंतिम दिनांक 06 नोव्‍हेंबर,  2025 असा आहे. शिक्षक मतदार संघासाठी नमुना क्रमांक-19 मधील अर्ज भरण्‍याची सूविधा आता ऑनलाईन उपलब्‍ध असून त्‍यासाठी  https://mahaelection.gov.in/ Citizen/Login  या संकेतस्‍थळावर लॉगीन करुन पात्र शिक्षकांना आवश्‍यक त्‍या पुराव...

अमली पदार्थ प्रतिबंध समन्वय समितीची बैठक तपासण्यांचे प्रमाण वाढवा - जिल्हाधिकारी वर्षा मीना

इमेज
  अमली पदार्थ प्रतिबंध समन्वय समितीची बैठक तपासण्यांचे प्रमाण वाढवा -         जिल्हाधिकारी वर्षा मीना अकोला, दि. २८ : जिल्ह्यात अमली पदार्थांची वाहतूक, विक्री होऊ नये यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे, तसेच तपासण्यांचे प्रमाण वाढवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी आज येथे दिले.   जिल्हा अमली पदार्थ प्रतिबंध समन्वय समितीच्या बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक सीमा झावरे, उपवनसंरक्षक नम्रता ताले, सहायक आयुक्त संतोष पोवराज, समाजकल्याण सहायक आयुक्त मारोती वाठ यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, जिल्ह्यात कुठेही अंमली पदार्थांची वाहतूक, विक्री होता कामा नये यासाठी विविध विभागांकडून होणा-या वाहने, पार्सल, नाका तपासणी, डॉग युनिटद्वारे रेल्वेगाड्यांची तपासणी आदी तपासण्यांत सातत्य ठेवावे. कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. भावी पिढीला व्यसनांपासून मुक्त ठेवण्यासाठी योग्य माहितीचा प्रसार, तसेच संबंधित निय...

जिल्ह्यात पावसाची शक्यता

  जिल्ह्यात पावसाची शक्यता अकोला, दि. २८ : जिल्ह्यात दि. २८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. या दरम्यान वा-यांचा वेग ताशी ३० ते ४० कि. मी. असेल. अशास्थितीत नागरिकांनी वीज, वारा व पावसापासून बचाव करण्यासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडाखाली आश्रय घेऊ नये. नदीकाठावरील गावांना सतर्कतेची सूचना देण्यात आली आहे. ०००

सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ विशेष स्वरूपात साजरा होणार !

  विशेष लेख : सरदार वल्लभभाई पटेल  यांची  १५० व ी  जयंती ‘ राष्ट्रीय एकता दिवस ’  विशेष स्वरूपात साजरा  होणार  !   भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ३१ ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिवस   म्हणून  साजरा केला जातो. या वर्षी त्यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने हा दिवस भव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे. हा दिवस भारताच्या एकता ,  अखंडता आणि राष्ट्रीय एकजुटतेचे प्रतीक असून ,  ५६२ संस्थान एक त्रि त येऊन आधुनिक भारताची पायाभरणी करणाऱ्या सरदार पटेलांच्या अद्वितीय कार्याला अभिवादन करणार आहे.   एकतानगर येथे भव्य परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रम   या वर्षीचा उत्सव नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक समृद्धीचा संगम असणाऱ्या गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील एकतानगर येथे आयोजित केला जाणार आहे. हे ठिकाण  “ विविधतेत एकता ”   या भारताच्या संकल्पनेचे प्रतीक म्हणून निवडले गेले आहे. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल राज्य पोलीस दल आणि राष्ट्रीय कॅडेट कोर यांच्या सहभागाने भव्य परेड आण...

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे दि. 3 नोव्हेंबरला आयोजन

  जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे दि. 3 नोव्हेंबरला आयोजन अकोला, दि. 27 : जिल्हास्तरीय लोकशाही दिन व दिव्यांग लोकशाही दिन दि. 3 नोव्हेंबरला सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.   सर्व संबंधित, तसेच अधिकारी व कर्मचा-यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वीच्या प्रलंबित तक्रारींचा अनुपालन अहवाल लोकशाहीदिनापूर्वी सादर करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन व दिव्यांग लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. 000  

अनुसूचित जाती उमेदवारांसाठी उद्योजकता प्रशिक्षण

    अनुसूचित जाती उमेदवारांसाठी उद्योजकता प्रशिक्षण                          अकोला, दि. 24 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील युवक व युवतींसाठी एक महिना कालावधीचे विनामूल्य उद्योजकता विकास प्रशिक्षण आयोजिण्यात आले आहे. या शिबिराचा सुरूवात दि. ३० ऑक्टोबरला होऊन ते दि. २९ नोव्हेंबरला पूर्ण होईल. अनुसूचित जातीतील युवक-युवती , नवउद्योजकांना उद्योजकता विकासासंबंधी प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःचा   उद्योग व्यवसाय - स्वयंरोजगार   निर्माण   करण्यास प्रवृत्त करणे हा कार्यक्रमाचा उद्देश आहे. अ निवासी स्वरुपाच्या या प्रशिक्षण कार्यक्रमामधून सहभागी प्रशिक्षणार्थींना उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, विविध क्षेत्रातील उद्योगसंधी , उद्योगाची निवड   आदींचे प्रशिक्षण मिळेल. त्याचप्रमाणे, उद्योग उभारणी व व्यवस्थापन ,बाजारपेठ पाहणी व व्यवस्थापन,   उद्योग व्...

शासकीय आदिवासी आश्रम शाळेत शिक्षकांच्या रिक्त जागा बाह्यस्रोताद्वारे भरणार

  शासकीय आदिवासी आश्रम शाळेत शिक्षकांच्या रिक्त जागा बाह्यस्रोताद्वारे भरणार अकोला, दि. १७   : आदिवासी विकास आयुक्तांच्या आदेशान्वये शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांची रिक्त असलेली पदे तात्पुरत्या स्वरुपात भरण्याबाबत वाह्यस्रोताद्वारे भरण्यात येत आहेत. त्यासाठी मे. छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था आणि मे, महाराष्ट्र विकास ग्रुप या संस्थांना आदेश देण्यात आला आहे. या संस्थांमार्फत शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत आहे. या संस्थांमार्फत शासकीय आश्रमशाळेवर याआधी नियुक्ती देण्यात आलेल्या शिक्षकांपैकी काही शिक्षक हे अद्याप शाळेवर हजर झाले नाहीत. त्यामुळे अकोला, वाशिम व बुलढाणा या कार्यक्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त पदांचा आढावा घेण्यात आला. जे शिक्षक अद्याप हजर झालेले नाहीत त्या जागांचा विचार करून विषयानुसार रिक्त जागांनुसार पुन्हा अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांना दि. 20 ते दि. 31 ऑक्टोबर दरम्यान ऑनलाईन अर्ज करता येतील. इच्छूकांनी एमव्हीजीकंपनी.इन या संकेतस्थळावर ( https://mvgcompany.in ) अर्ज दाखल करावेत, असे आवाहन आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मोह...

क्रीडा विभागाचा उपक्रम ‘सरदार@150 युनिटी मार्च’; जिल्हास्तरावर काढणार पदयात्रा

  क्रीडा विभागाचा उपक्रम ‘सरदार @ 150 युनिटी मार्च’; जिल्हास्तरावर काढणार पदयात्रा   अकोला, दि. १७   : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारच्यावतीने   ' सरदार @ १५० युनिटी मार्च '   या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय पदयात्रेचा शुभारंभ २६ नोव्हेंबर रोजी तर राज्यात या मोहिमेचा शुभारंभ ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे.   या मोहिमेअंतर्गत  “ विकसित भारत पदयात्रा ”  उपक्रमाद्वारे युवकांमध्ये देशभक्ती ,   एकता आणि नागरी जबाबदारी जाणीव ,   राष्ट्रीय अभिमानाची भावना दृढ करणे ,   नागरी सहभाग वाढविणे आणि युवकांमध्ये एकतेची व देशभक्तीची भावना रुजविण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्तराबरोबरच राज्यातही सरदार @ 150 एकता मार्चचे आयोजन करण्यात येत आहे. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या राष्ट्रीय एकतेतील योगदानाचे स्मरण ठेवण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याद्वारे भारताचा सामाजिक ,   सांस्कृतिक आणि आर्थिक उत्कर्ष साधणे व एकात्मता वाढव...