जिल्हाधिकारी कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

अकोला, ३१: प्रजाहितदक्ष, कुशल प्रशासक, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी उप जिल्हा निवडणुक अधिकारी महेश परंडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, तसेच विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. ०००