अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक

   मा.भारत निवडणूक आयोगाने दिनांक 16/03/2024 रोजीच्‍या पत्रकार परिषदेव्‍दारे  विधानसभा रिक्‍त पदांच्‍या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केलेला आहेतसेच तात्‍काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू करण्‍यात आलेली आहेसदर निवडणूक कार्यक्रमांतर्गत 30-अकोला (पश्चिम) विधानसभा मतदार संघाकरीता पोट निवडणूक घेण्‍यात येणार आहे. मा.भारत निवडणूक आयोगाकडून जाहीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

 

1

निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्‍द करणे   नामनिर्देशनपत्र दाखल करण्‍याचा दिनांक

28/03/2024

2

नामनिर्देशनपत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक

04/04/2024

3

ना‍मनिर्देशनपत्र  छाननी करण्‍याचा दिनांक

05/04/2024

4

उमेदवारी मागे घेण्‍याचा अंतिम दिनांक

08/04/2024

5

मतदानाचा दिनांक

26/04/2024

6

मतमोजणीचा दिनांक

04/06/2024

 

v  उमेदवाराचे वयः निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकरीता हस्‍तपुस्तिका-2023 मधील तरतुदीनुसार उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी उमेदवाराचे हे कमीत कमी 25 वर्षे असावे.

 

v  अनामत रकमेबाबतः

                        लोकप्रतिनिधीत्‍व अधिनियम, 1951 चे कलम 34 नुसार लोकसभा निवडणूक व विधानसभा निवडणूकीकरीता अनामत रक्‍कम खालीलप्रमाणे भरणा करणे अनिवार्य आहे-

 

विधानसभा निवडणूक

सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांकरीता

अ.जा./अ.ज. प्रवर्गातील उमेदवारांकरीता

10,000/- (रुपये दहा हजार)

5,000/-(रुपये पाच हजार )

 

            वरीलप्रमाणे अनामत रक्‍कम ही रोख स्‍वरुपात निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करावी अथवा  सदर अनामत रक्‍कम 8443-CIVIL DEPOSITS-121-DEPOSITS IN CONNECTION WITH ELECTIO

 

 

 

 

 

 

 

 

 

NS-2- DEPOSITS MADE BY CANDIDATES FOR PARLIAMENT.” या लेखाशिर्षाखाली बॅंकेमार्फत चलान व्‍दारे भरणा करता येईल. चलान व्‍दारे भरणा केलेल्‍या अनामत रक्‍कमेचे चलान नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे.

 

v  निवडणूक खर्च मर्यादाः

            मा.भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार विधानसभा निवडणूकीसाठी  4000000/-(रुपये चाळीस लाख रुपये फक्‍त) एवढी आहे.

 

v  कोरे नामनिर्देशनपत्र वाटप व स्विकारण्‍याचे ठिकाणः  

 

1

कोरे नामनिर्देशनपत्र वाटप  स्विकारण्‍याचे ठिकाण

उपजिल्‍हाधिकारी महसूल यांचे दालन, नविन इमारत  जिल्‍हाधिकारी कार्यालय, अकोला

   

v  SPECIFIED ARO:  P. Z. Bhosale, Nazul Tahsildar

 

v  अकोला जिल्‍हयातील 30-अकोला पश्चिम विधान सभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांची माहिती खालील प्रमाणे आहे-

 

 

अ.क्र.

विधानसभा मतदारसंघाचे नांव

  निवडणूक निर्णय अधिकारी यांचे नांव

मोबाईल क्रमांक

3

30-अकोला पश्चिम वि.स.म.सं.

श्रीमती अनिता भालेराव,

उप जिल्‍हाधिकारी (महसूल) तथा   निवडणूक निर्णय अधिकारी

9422273245

 

 

v  30-अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघाचे निवडणूकीची निवडणूक विषयक कामे व्‍यवस्थितरित्‍या व कालमर्यादेत पार पाडण्‍याकरीता विविध समित्‍या गठीत करुन त्‍या करीता नोडल अधिकारी यांच्‍या नियुक्‍त्‍या करण्‍यात आल्‍या आहेत त्‍याचा तपशिल खालील प्रमाणे आहे.

 

अ.क्र.

विषय

नोडल अधिकारी यांचे नाव व पदनाम

1

स्विप समिती (SVEEP Committee)

श्रीमती गीता ठाकरे, उपायुक्‍त महानगर पालीका अकोला.

2

District Grievence Committee for Seizure and release of cash and other items

श्री. जंजाळ, कृषी विकास अधिकारी, जिल्‍हाधिकारी कार्यालय अकोला.

3

आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी समिती (Implementing MCC)

श्री. हरिष खंडारे, नगर रचनाकार, महानगर पालीका, अकोला

4

परवानगी कक्ष वाहन प्रचारसभा रॅली मिरवणूक परवाना ईतर
(Permissions)

श्रीमती अर्चना निमजे, सहायक पुरवठा अधिकारी, अकोला.

5

कर्मचारी व्‍यवस्‍थापन समिती (Manpower Management)

श्री.पी. झेड भोसले, नझुल तहसिलदार, अकोला.

6

प्रशिक्षण व्‍यवस्‍थापन समिती
(Training Management Committee)

श्री.पी. झेड भोसले, नझुल तहसिलदार, अकोला.

7

सर्व आदेश वितरण करणे  (अधिग्रहित पथके)  Order Distribution

श्री.पी. झेड भोसले, नझुल तहसिलदार, अकोला.

8

30-अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघ  निवडणूक आराखडा समिती (30Akola West Assembley Constitucy Election Plan)

श्री. जि.पी.वाकूडकर नायब तहसिलदार नैसर्गीक आपती शाखा जिल्‍हाधिकारी कार्यालय अकोला

9

30-अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघ  संपर्क आराखडा समिती (30Akola West Assembley Constitucy Communication Plan)

श्री. जि.पी.वाकूडकर नायब तहसिलदार नैसर्गीक आपती शाखा जिल्‍हाधिकारी कार्यालय अकोला

10

वाहतूक व्‍यवस्‍थापन समिती (Transport Management Committee )

श्री.श्‍याम धनमने, अधिक्षक, जिल्‍हाधिकारी कार्यालय अकोला.

11

कायदा व सुव्‍यवस्‍था
(Law & Order, VM, District Security Plan Committee )

श्री. हरिष खंडारे, नगर रचनाकार, महानगर पालीका, अकोला

12

मतदान केंद्र सुसुत्रीकरण समिती
(Polling Station Rationalization Management Committee )

श्री शाम धनमनेअधिक्षक
 
जिल्‍हाधिकारी कार्यालय अकोला

13

निवडणूक  साहित्‍य समिती
(Material Management Committee )

श्री शाम धनमनेअधिक्षक
 
जिल्‍हाधिकारी कार्यालय अकोला

13

इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांचे व्‍यवस्‍थापन
(EVM Management Committee )

महेश कुमार घारे, सहायक राज्‍यकर आयुक्‍त विक्रीकर कार्यालय अकोला

15

उमेदवार यांचे खर्च विषयक व्‍यवस्‍थापन (Expenditure Management Committee)

श्री.पी. झेड भोसले, नझुल तहसिलदार, अकोला.

16

टपाली मतपत्रिकासर्व्‍हीस वोटर
ETPBS & Postal Ballot Paper Committee

श्री.पी. झेड भोसले, नझुल तहसिलदार, अकोला.

17

प्रसार माध्‍यम  व संदेशवहन समिती
Media & Communication Monitoring Committee (MCMC)

श्री. ए आर देव सहा. संशोधन अधिकारी, जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय अकोला.

18

Provision for Polling Staff Welfare (Lodging Boarding and Transportation)

श्रीमती अर्चना निमजे, सहायक पुरवठा अधिकारी, अकोला.

19

मतपत्रिका समिती
Ballot Paper Committee

श्री.पी. झेड भोसले, नझुल तहसिलदार, अकोला.

20

२४/७ जिल्‍हा नियंत्रण मदत व तक्रार निवारण कक्ष १९५० २४/७ District Contact Centre Help desk & Grevience Centre १९५०

श्री. जि. पी. वाकूडकर नायब तहसिलदार नैसर्गीक आपती, जिल्‍हाधिकारी कार्या. अकोला

21

दिव्‍यांग व्‍यक्‍तींसाठी मदत  कक्ष व त्‍यांना सोई सुविधा पुरवणेबाबत PWD Accessibility Committee

श्री. संजय राजनकर, दिव्‍यांग कक्ष विभाग प्रमुख महानगर पालीका अकोला.

22

डॅशबोर्ड व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे

श्री.पी. झेड भोसले, नझुल तहसिलदार, अकोला.

23

C-VIGIL, तांत्रीक कक्ष Technical Section

श्री.पी. झेड भोसले, नझुल तहसिलदार, अकोला.

24

नामनिर्देशन समिती
Nomination Committee

श्रीमती ए एस भालेराव सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्‍हाधिकारी महसूल अकोला

25

निवडणूक निरिक्षकांचे व्‍यवस्‍थापन
Observer Management Committee

श्री. आनंद गुप्‍ता, अन्‍न धान्‍य वितरण अधिकारी अकोला

26

मतमोजणी व्‍यवस्‍थापन समिती
 Counting Management Committee

श्रीमती अर्चना निमजे, सहायक पुरवठा अधिकारी, अकोला.

v  अंतिम मतदार यादीतील मतदारांचा तपशिलः

 

1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत दिनांक 23/01/2024 रोजी प्रसिध्‍द करण्‍यात आलेल्‍या अंतिम मतदार यादीतील मतदारांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे-

 

अ.क्र.

मतदार संघ

क्रमांक व नांव

मतदार संख्‍या

पुरुष

स्‍त्री

इतर

एकूण

3

30-अकोला (पश्चिम)

165843

162212

21

328076

 

            निरंतर पुनरिक्षण कार्यक्रमामध्‍ये प्राप्‍त होणा-या अर्जांवर नामनिर्देशन पत्र दाखल करण्‍याच्‍या शेवटच्‍या दिनांकापर्यंत निर्णय घेऊन अंतिम मतदार संख्‍या निश्चित करण्‍यात येते. त्‍याबाबत आपणास अवगत करण्‍यात येईल.

 

v  30-अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघामध्‍ये एकुण 307 मतदान केंद्रे असून त्‍यापैकी 307 मतदान केंद्रे शहरी भागात आहे.    मा.भारत निवडणूक आयोगाकडील निर्देशानुसार सर्वच मतदान केंद्रांवर आवश्‍यक त्‍या सुविधा उपलब्‍ध करुन घेण्‍यात आलेल्‍या  आहेत.

v  Facilitation Center for Postal Ballot:

 

                        निवडणूक कर्तव्‍यावर असणा-या अधिकारी/कर्मचारी यांना मतदानाचा हक्‍क बजावता यावा याकरीता मतदार संघनिहाय सुविधा केंद्र स्‍थापन करण्‍यात आले आहे. त्‍याचा तपशिल खालीलप्रमाणे आहे-

 

अ.क्र.

मतदार संघ क्रमांक व नांव

नोडल अधिकारी नांव व पदनाम

ठिकाण

3

30 - अकोला पश्चिम वि.स.म.सं.

श्री.रतनसिंग पवार,

गटशिक्षणाधिकारी प्राथ. अकोला

नवीन प्रशासकीय इमारत, जिल्‍हाधिकारी कार्यालय, अकोला

 

v  30-अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघाकरीता आचार संहितेच्‍या प्रभावी अंमलबजावणी करीता खालीलप्रमाणे FST/SST/VST/VVT त्‍यादी पथके नियुक्‍त करण्‍यात आली आहेत त्‍याचा तपशिल खालीलप्रमाणे आहे-

 

मतदार संघ क्रमांक व नांव

FST

SST

VST

VVT

Accounting

MCC

पथकांची संख्‍या

कर्मचारी संख्‍या

चेकपोस्‍ट संख्‍या

पथकांची संख्‍या

कर्मचारी संख्‍या

पथकांची संख्‍या

कर्मचारी संख्‍या

पथकांची संख्‍या

कर्मचारी संख्‍या

पथकांची संख्‍या

कर्मचारी संख्‍या

पथकांची संख्‍या

कर्मचारी संख्‍या

30-अकोला (पश्चिम)

7

28

5

16

64

4

16

1

4

1

5

3

12

v  30-अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघामध्‍ये महिलायुवादिव्‍यांग अधिकारी व कर्मचारी यांचे व्‍दारे संचलित करण्‍यात येणा-या मतदान केंद्राची माहिती खालील प्रमाणे आहे-

 

अ.क्र.

विधानसभा मतदारसंघाचे  नांव

महिला संचलीत मतदान केंद्राची संख्‍या

युवा संचलीत मतदान केंद्राची संख्‍या

दिव्‍यांग संचलीत मतदान केंद्राची संख्‍या

3

30-अकोला पश्चिम वि.स.म.सं.

2

2

1

 

महिला अधिकारी / कर्मचारी व्‍दारे संचलित मतदान केंद्रांची यादी

.क्र.

वि...सं.चे नाव

मतदान केंद्राचे नाव

1

30-अकोला (पश्चिम)  वि.स.म.सं.

162-मुंगीलाल बाजोरीया कॉन्‍वहेंटअकोला खोली क्र.1

2

143-मोहरीदेवी खंडेलवाल कन्‍या शाळा खोली क्र.1

 

युवा अधिकारी/कर्मचारी व्‍दारे संचलित मतदान केंद्रांची यादी

 

अ.क्र.

वि.स.म.सं.चे नाव

मतदान केंद्राचे नाव

1

30-अकोला  पश्चिम वि.स.म.सं.

47-शिवाजी कॉलेज नरनाळा इमारत खोली क्र 2

2

30-अकोला  पश्चिम वि.स.म.सं.

135-भिकमचंद खंडेलवाल शाळा खोली क्र 1 पुर्व कडील इमारत

 

 

दिव्‍यांग अधिकारी/कर्मचारी व्‍दारे संचलित मतदान केंद्रांची यादी

 

अ.क्र.

वि.स.म.सं.चे नाव

मतदान केंद्राचे नाव

1

30-अकोला (पश्चिम) वि.स.म.सं.

233-गुरुनानक विदयालय खोली क्र.6

           

           

v 30-अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघामध्‍ये परदानशिन मतदान केंद्राची संख्‍या खालील प्रमाणे आहे-

 

अ.क्र.

विधानसभा मतदारसंघाचे  नांव

मतदान केंद्राची संख्‍या

1

30 अकोला पश्चिम वि.स.म.सं.

180

 

v  30-अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघामध्‍ये एकुण 307 मतदान केंद्र राहणार असून सदर मतदान केंद्राकरिता 28 सेक्‍टर/झोनल अधिकारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

 

v  30-अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघामध्‍ये मतदाना करीता लागणारे अधिकारीकर्मचारी यांची माहिती खालील प्रमाणे आहे. प्रत्‍येक मतदान केंद्रावर केंद्राध्‍यक्ष-1 व मतदान अधिकारी-3 तसेच मतदारांना मदत करण्‍यासाठी मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी यांची नियुक्‍ती करण्‍यात येणार आहे. त्‍याचा तपशिल खालील प्रमाणे आहे-

 

अ.क्र.

केंद्राध्‍यक्ष यांची  संख्‍या

मतदान अधिकारी

क्रमांक.1

मतदान अधिकारी

क्रमांक.2

मतदान अधिकारी

क्रमांक.3

परदानशीन मतदान केंद्रावर महिला कर्मचारी यांची संख्‍या

मतदान केंद्र स्‍तरीय अधिकारी

आरोग्‍य कर्मचारी

1

307

307

307

307

180

307

307

 

v  अकोला जिल्‍ह्यामध्‍ये उपलब्‍ध मतदान यंत्र व व्‍हीव्‍हीपॅट ची माहिती (FLC OK):

 

1

बॅलेट युनिटांची संख्‍या (BUs)

अप्राप्‍त

2

कंट्रोल युनिटांची संख्‍या (CUs)

अप्राप्‍त

3

व्‍ही व्‍ही पॅटची संख्‍या (VVPATs)

अप्राप्‍त

 

v  30-अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघाचे निवडणूकीकरीता मतदान प्रक्रिया पुर्ण झाल्‍यानंतर मतदान केंद्रावर वापरण्‍यात आलेले मतदान यंत्र (EVM / VVPAT ठेवण्‍याकरीता जिल्‍हास्‍तरावरील सुरक्षा कक्ष  मतमोजणी ठिकाणाचा तपशील-

 

30-अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघाकरीता निश्चित सुरक्षा कक्ष व मतमोजणीचे ठिकाण

शासकीय गोडावून क्र. 1कक्ष क्र. 2 जिल्‍हाधिकारी कार्यालय अकोला.

 

 

v  30-अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघाचे निवडणूकीकरीता मतदान प्रक्रिया पुर्ण झाल्‍यानंतर मतदान केंद्रावर वापरण्‍यात आलेले मतदान यंत्र (EVM/ VVPAT) तात्‍पुरत्‍या स्‍वरुपात ठेवण्‍याकरीता सहायक निवडणूक अधिकारी यांचे स्‍तरावरील सुरक्षा कक्षाची माहिती खालील प्रमाणे आहे-

 

वि.स.म.सं.

ठिकाण

30-अकोला पश्चिम वि.स.म.सं.

शासकीय धान्‍य गोडावून क्र.1 जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसर अकोला

 

v मतदान साहित्‍य वाटप व स्विकारण्‍याचे ठिकाण

 

वि.स.म.सं.

साहित्‍य वाटप ठिकाण

साहित्‍य स्विकारण्‍याचे ठिकाण

30-अकोला पश्चिम वि.स.म.सं.

जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसर अकोला 

जिल्‍हाधिकारी कार्यालय परिसर अकोला 

 

v 30-अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघाचे निवडणूकीकरीता नागरिकांना टोल फ्री असलेला 0724–2404225 हा दुरध्वनी क्रमांक निवडणूक विषयक कोणतीही तक्रार नोंदविण्या करिता किंवा माहिती विचारण्या करिता कार्यान्वित करण्यात आला आहे

 

     भारत निवडणूक आयोगाने निवडणूकीत घडणा-या गैरप्रकारावर आळा घालण्याकरिता व  नागरीकांचे सुविधे करिता C-Vigil Application तयार केला असून सदर Application व्दारे कोणत्याही नागरीकास अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास सदर Application व्दारे व्हिडीओ किंवा फोटो अॅप व्दारे अपलोड करून तक्रार नोंदविता येईल व अश्या तक्रारीवर कार्यवाही करण्यात येईल.

           आचारसंहीतेच्या कालावधित राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी काय करावे व काय करु नये या बाबतची सविस्तर माहिती राजकीय पक्षांसोबत आयोजित सभेत देण्यात आलेली आहे. त्याच प्रमाणे राजकीय पदाधिकारी यांचे वाहन जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करणे बाबत संबंधितांना पत्राव्दारे निर्देश देण्यात आले आहेत.

 

v  आचार संहिता अंमलबजावणीबाबत मा.भारत निवडणूक आयोगाकडून प्राप्‍त सूचना-

1.  विधानसभा निवडणूकीतील  उमेदवारांनी निवडणूकांच्‍या खर्चाकरीता स्‍वतंत्र बॅंक खाते उघडणेबाबत

            मा.भारत निवडणूक आयोगाकडील पत्र क्रमांकः76/INSTRUCTION/ 2024/EEPS/Vol.IV दिनांक 15 ऑक्‍टोबर 2023 रोजीच्‍या पत्रान्‍वये आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चे अनुषंगाने संभाव्‍य उमेदवारांची निवडणूकांच्‍या खर्चाकरीता उमेदवारी अर्ज भरण्‍यापूर्वी किमान एक दिवस अगोदर स्‍वतंत्र बॅंक खाते उघडणे बंधनकारक असल्‍याबाबत तसेच उमेदवार व प्रतिनिधी यांचे संयुक्‍त खाते चालत असल्‍याबाबत सर्व उपस्थितांना अवगत करुन देण्‍यात आले. याकरीता संबंधीत उमेदवारांना आवश्‍यक सहकार्य करण्‍याबाबत, त्‍वरीत धनादेश पुस्‍तीका (Cheque Books) निर्गमीत करण्‍याबाबत त्‍याचप्रमाणे स्‍वतंत्र काऊंटर सुरु करुन निवडणूक कालावधीमध्‍ये सदर उमेदवारांना रक्‍कमा जमा करणे व काढणेकरीता प्राधान्‍य देण्‍याबाबत 30- अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघातील सर्व बॅंकांना जिल्‍हा अग्रणी बॅंक अकोला यांचेमार्फत या कार्यालयाकडून पत्र निर्गमीत करण्‍यात आलेले आहे.

 

2.  Model Code of Conduct- Instruction- Celebration of Important Days- reg.

            मा.भारत निवडणूक आयोगाकडील पत्र क्रमांकः437/6/INST/ECI/FUNCT/MCC/2024 (Important Days)/ 170 दिनांक 2 जानेवारी 2024 रोजीच्‍या पत्रान्‍वये आचार संहिता कालावधीमध्‍ये स्‍वातंत्र्य दिन, गणतंत्र दिन इत्‍यादी राष्‍ट्रीय सण ध्‍वजारोहण करुन साजरा करावा. त्‍यात कुठल्‍याही परिस्थितीत राजकीय प्रचार करण्‍याचे दृष्‍टीने भाषण देता येणार नाही. त्‍याचप्रमाणे सद्भावना दिवस, गांधी जयंती, इफतार पार्टी इत्‍यादींच्‍या आयोजनामध्‍ये राजकीय सहभाग नसावा त्‍याचप्रमाणे त्‍यामध्‍ये कुठल्‍याही राजकीय पक्षाचा प्रचार/प्रसार करता येणार नाही.

 

3.  Bye Election State legislative Assemblies-(i) Engagement of Child Labour and (ii) Engagement of Child in Election related activities-reg.

            मा.भारत निवडणूक आयोगाकडील पत्र क्रमांकः4/3/2023/SDR/-Vol.X दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजीच्‍या पत्रान्‍वये बाल कामगार प्रतिबंधीत कायदा, 1986 मधील 3(1) नुसार कुठल्‍याही क्षेत्रात लहान मुलांचा कामगार म्‍हणून वापर करण्‍यास बंदी घालण्‍यात आलेली आहे. त्‍याअनुषंगाने निवडणूक प्रचाराकरीता आयोजित रॅली, सभा इत्‍यादींकरीता बालकांचा वापर करता येणार नाही.

 

4.  Enforcement of the Model Code of Conduct Do’s and Don’ts

            मा.भारत निवडणूक आयोगाकडील पत्र क्रमांकः437/6/INST/ECI/FUNCT/ MCC/2024 (MCC Enforcement)/280 दिनांक 2 जानेवारी 2024 रोजीच्‍या पत्रान्‍वये आचार संहिता कालावधीमध्‍ये राजकीय पक्षांनी काय करावे व काय करु नये याबाबत सविस्‍तर सूचना दिलेल्‍या आहेत.

            सदर पत्रातील सूचनांनुसार आचारसंहिता ही पुर्णतः अ‍थवा अंशता केंद्र/राज्‍य शासन अनुदानीत सर्व संस्‍था, समित्‍या, परिषदा, आयोग इत्‍यादींना लागू राहील.

            अत्‍यावश्‍यक बाबीं व्‍यतिरिक्‍त मतदारांवर प्रभाव टाकणारे अन्‍य कुठलेही नवीन उपक्रम/योजना किंवा आर्थीक बाबींची घोषणा आचार संहिता कालावधीत करता येणार नाही.

 

5.  Model Code of Conduct – Instruction – Election Campaign

            मा.भारत निवडणूक आयोगाकडील पत्र क्रमांकः437/6/INST/ECI/FUNCT/MCC/2024 (Campaign)/525 दिनांक 2 जानेवारी 2024 रोजीच्‍या पत्रान्‍वये निवडणूक प्रचाराच्‍या कालावधीत शांतता व सुव्‍यवस्‍था राखण्‍यासाठी वेळोवेळी निर्गमित केलेल्‍या सूचनांबाबत उपस्थितांना अवगत करुन देण्‍यात आले. सदर सूचनांमध्‍ये दुचाकींचा वापर, रोड शो, सभांमध्‍ये लाऊड स्‍पीकर चा वापर, झेंडे वापरणे, तात्‍पुरते प्रचार कार्यालय, SMS चा गैरवापराबाबत निर्बंध, राजकीय कार्यक्रमांवरील निर्बंधाबाबत, शाळांचे मैदान निवडणूक प्रक्रियेकरीता वापर, स्‍टार प्रचारक इत्‍यादी बाबत वेळोवेळी आवश्‍यक त्‍या परवानगी घेणे अनिवार्य आहे.

 

6.  Model Code of Conduct-Publication of Advertisements

            मा.भारत निवडणूक आयोगाकडील पत्र क्रमांकः437/6/INST/ECI/FUNCT/MCC/2024 (Advertisements)/388 दिनांक 2 जानेवारी 2024 रोजीच्‍या पत्रान्‍वये आचार संहिता कालावधीमध्‍ये प्रसिध्‍द करावयाच्‍या जाहीरातींबाबत सविस्‍तर सूचना दिलेल्‍या आहे.

            त्‍यानुसार निवडणूकीच्‍या जाहीराती, होर्डींग्‍स, बॅनर इत्‍यादी कुठल्‍याही शासकीय अथवा सार्वजनिक जागेवर लावण्‍यास निर्बध घालण्‍यात आलेले आहेत. कुठलीही राजकीय बातमी विमानतळ, रेल्‍वे स्‍टेशन, बस स्‍टॅन्‍ड, पोस्‍ट ऑफीस, शासकीय रुग्‍णालय इत्‍यादी ठिकाणी लावण्‍यास निर्बंध घालण्‍यात आलेले आहेत.

 

7.  Model Code of Conduct-Tour of Ministers during Election period

            मा.भारत निवडणूक आयोगाकडील पत्र क्रमांकः437/6/INST/ECI/FUNCT/MCC/2024 (Tour of Minister) /598 दिनांक 2 जानेवारी 2024 रोजीच्‍या पत्रान्‍वये कुठल्‍याही केंद्रीय अथवा राज्‍य मंत्र्यास आचार संहिता कालावधीमध्‍ये निवडणूका घोषित असलेल्‍या क्षेत्रामध्‍ये शासकीय दौरे करता येणार नाहीत. परंतु नैसर्गिक आपत्‍ती अथवा अशाप्रकारच्‍या तातडीच्‍या प्रसंगी ज्‍याठिकाणी मंत्री महोदयांना व्‍यक्‍तीशः उपस्थित राहणे अनिवार्य आहे त्‍याचवेळी आचार संहितेचा भंग न होऊ देता शासकीय दौरा करता येऊ शकतो.

 

8.  Model Code of Conduct-Instructions – Use of Vehicles during Elections reg.

            मा.भारत निवडणूक आयोगाकडील पत्र क्रमांकः437/6/INST/ECI/FUNCT/MCC/2024 (Vehicles)/450 दिनांक 2 जानेवारी 2024 रोजीच्‍या पत्रानुसार राज्‍य मंत्र्याचा दर्जा असलेले लोकप्रतिनिधी वगळता इतर लोकप्रतीनिधी यांना पुरविण्‍यात आलेली शासकीय वाहने आचार संहिता जाहीर होता बरोबर जिल्‍हाधिकारी यांचे कार्यालयात जमा करावयाची आहे. तसेच राज्‍य मंत्र्याचा दर्जा असलेल्‍या लोकप्रतिनिधी यांनी शासकीय वाहन हे फक्‍त निवास ते कार्यालय याप्रमाणेच वापरावयाचे आहे. कुठल्‍याही राजकीय कार्यक्रमाकरीता अथवा प्रचाराकरीता शासकीय वाहन वापरता येणार नाही.

 

9.  लोकप्रतिनिधीत्‍व अधिनियम 1951 चे कलम 77(1) व 127A व भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम  171नुसार उमेदवार/प्रतिनिधी यांनी खालीलप्रमाणे कार्यवाही करणे अभिप्रेत आहे-

 

लोकप्रतिनिधीत्‍व अधिनियम 1951 चे कलम 77(1)ः  सदर कलमान्‍वये प्रत्‍येक उमेदवारास त्‍यांनी नामनिर्देशन पत्र सादर केल्‍यापासून ते निकाल घोषित होईपर्यंतच्‍या कालावधीत होणा-या खर्चाचा हिशेब स्‍वतंत्र रित्‍या ठेवून तो उमेदवार अथवा त्‍यांनी प्राधिकृत केलेल्‍या प्रतिनिधीमार्फत निवडणूक खर्च नियंत्रण पथकाकडे सादर करावा.

 

लोकप्रतिनिधीत्‍व अधिनियम 1951 चे कलम 127(A):  सदर कलमान्‍वये निवडणूकीशी संबंधीत पाम्फलेट, पोस्‍टर छपाईवर निर्बंध घालण्‍यात आले आहे. आचार संहिता कालावधीत कोणीही व्‍यक्‍ती निवडणूकीशी संबंधीत पाम्‍फलेट/पोस्‍टर छपाई करत असेल तर त्‍याच्‍या मुखपृष्‍ठावर प्रकाशकाचे, मुद्रणालयाचे व छपाई करण्‍यात आलेली संख्‍या नमूद करणे आवश्‍यक आहे. त्‍याचप्रमाणे छपाई करण्‍यात आलेल्‍या मजकुराची प्रत संबंधीत मुद्रणालयाव्‍दारे जिल्‍हाधिकारी कार्यालयास सादर करणे अनिवार्य आहे.

 

भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम  171H: सदर कलमान्‍वये निवडणूकीशी संबंधीत बेकायदेशीर पेमेंट बाबत सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. जो कोणी उमेदवाराच्‍या पुर्व परवानगीशिवाय कोणतीही सार्वजनिक सभा घेत असेल अथवा जाहीरात प्रसिध्‍द करुन निवडणूक विषयक प्रचार करीत असेल तर अशा उमेदवाराविरुध्‍द दंडात्‍मक कारवाई करण्‍याची तरतूद आहे.

 

v  PwDs आणि 85 पेक्षा अधिक वयाच्‍या मतदारांना Home Voting च्‍या सूवीधेबाबत-

           मा.भारत निवडणूक आयोगाकडील पत्र क्रमांकः3/4/2022/SDR/Vol.II दिनांक 11 सप्‍टेंबर 2023 रोजीच्‍या पत्रान्‍वये निवडणूक नियम 1961 मधील कलम 27A नुसार ज्‍या मतदाराची 40पेक्षा अधिक अपंगत्‍व असल्‍यामुळे मतदार यादीमध्‍ये दिव्‍यांग म्‍हणून नोंद करण्‍यात आलेली आहे तसेच ज्‍या व्‍यक्‍तीला बेंचमार्क अपंगत्‍व आलेले आहे अशा मतदारांना अपंगत्‍व प्रमाणपत्र सादर करुन त्‍याचप्रमाणे 85 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले असे मतदार जे मतदान केंद्रापर्यंत स्‍वतः जावू शकत नाही अशा मतदारांना टपाली मतपत्रिकेची / Home Voting ची सुवीधा मा.भारत निवडणूक आयोगाने उपलब्‍ध करुन दिलेली आहे. त्‍याकरीता अशा मतदारांनी आवश्‍यक ते प्रमाणपत्र/दाखला सह विकल्‍प देणे बंधनकारक आहे.

*****


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ