जिल्हाधिका-यांकडून अकोट, मूर्तिजापूर येथील तयारीचा आढावा

 

 

जिल्हाधिका-यांकडून अकोट, मूर्तिजापूर येथील तयारीचा आढावा




अकोला, दि. 27 : आदर्श आचारसंहितेचा कुठेही भंग होणार नाही याची दक्षता घेतानाच, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक कार्यवाही काटेकोरपणे पूर्ण करावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज दिले.

जिल्ह्यातील अकोट व मूर्तिजापूर येथे भेट देऊन त्यांनी यंत्रणेची पाहणी केली. उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिका-यांनी अकोट व मूर्तिजापूर येथील आचारसंहिता नियंत्रण कक्ष, परवाना कक्ष, ईव्हीएम स्ट्रॉँगरूम, पोस्टल मतपत्रिका कक्ष आदींची पाहणी केली. निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचारी पथकांनी ‘अलर्ट मोड’वर राहून आयोगाच्या प्रत्येक सूचनेनुसार कार्यवाही करावी. आचारसंहितेचा भंग कुठेही होऊ नये, यासाठी सजग देखरेख ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ