ग्रामसेवक व पोलीस पाटील यांच्यासाठी सोमवारी बालविवाह प्रतिबंध कार्यशाळा

 

ग्रामसेवक व पोलीस पाटील यांच्यासाठी  

 सोमवारी बालविवाह प्रतिबंध कार्यशाळा 

अकोला, दि. 1 : महिला व बालविकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व एन्करेज एज्युकेशन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामसेवक, पोलीस पाटील व अंगणवाडी सेविका यांच्यासाठी बालविवाह प्रतिबंध कार्यशाळा सोमवार, दि. 4 मार्च रोजी प्रमिलाताई ओक सभागृहात होणार आहे.

 

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता कार्यशाळेचे उद्घाटन होईल. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य अॅड. संजय सेंगर, मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव योगेश पैठणकर, जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, बाल कल्याण समितीचे सदस्य उपस्थित राहतील. जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक, पोलीस पाटील व अंगणवाडी सेविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी केले आहे. 

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ