मुद्रांक शुल्क अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

मुद्रांक शुल्क अभय योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

अकोला, दि. 27 :  मुद्रांक अधिनियमानुसार न भरलेले मुद्रांक शुल्क भरण्यासाठी अभय योजनेची संधी उपलब्ध आहे. तरी संबंधितांनी 31 मार्चपूर्वी शुल्क व शास्ती जमा करून अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग – 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी विजय तेलंग यांनी केले आहे.

जिल्ह्यात सन 2020 पूर्वी निष्पादित दस्तऐवजांचा विशेष पथकामार्फत शोध घेण्यात आला व अपेक्षित शुल्क न भरलेल्या संबंधितांना नोटीसा बजावण्यात आल्या. त्यात सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी वितरित केलेली कंत्राटांची एकूण 673 प्रकरणे, कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडून वितरित करण्यात आलेले गाळे एकूण 158 प्रकरणे, तसेच महानगरपालिकेच्या कार्यकंत्राटाचे एकूण 137 प्रकरणांमध्ये महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमाच्या कलम 33 अन्वये अवरुध्द करण्यात येऊन सर्वांना मागणी नोटीस बजावण्यात आली आहे.

अशा प्रकरणी बऱ्याच पक्षकारांनी मुद्रांक शुल्क व शास्ती शासन जमा करून अभय योजनेचा लाभ घेतलेला आहे. तरी उर्वरित पक्षकारांनी योजनेचा 31 मार्चपूर्वी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ