‘सीबीएसई’ परीक्षा उपकेंद्रावर प्रतिबंधात्मक आदेश

 

‘सीबीएसई’ परीक्षा उपकेंद्रावर प्रतिबंधात्मक आदेश

अकोला दि.20 : केंद्रीय शिक्षा बोर्डाच्या परिक्षेच्या पाच उपकेंद्रांवर शंभर मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जारी केले. अकोला येथील स्कुल ऑफ स्कॉलर्स, नोएल स्कुल, जवाहर नवोदय विद्यालय, पोद्दार इंटरनॅशनल स्कुल व अकोट येथील विद्यांचल स्कुल येथील परिक्षा उपकेंद्रांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश 2 एप्रिल पर्यंत सकाळी 10 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत लागू राहतील.

त्यानुसार परिसरात 5 हून अधिक व्यक्तींना एकत्रित प्रवेश, झेरॉक्स, फॅक्स, पानपट्टी, ध्वनीक्षेपक आदी चालवणे, इंटरनेट, मोबाईल साधने सोबत बाळगणे अनधिकृत व्यक्ती किंवा  वाहन प्रवेश करणे आदी सर्व बाबींना मनाई करण्यात आली आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ