सहकार मंत्रालयाकडून जिल्ह्यातील सरपंच व तरूणांसाठी पुण्यात कार्यशाळा

सहकार मंत्रालयाकडून जिल्ह्यातील सरपंच व तरूणांसाठी पुण्यात कार्यशाळा

अकोला, दि. 1 : केंद्र शासनाचे सहकार मंत्रालय, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट यांच्यामार्फत अकोला जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच व होतकरू ग्रामीण तरूणांच्या पुढाकारातून नवीन प्राथमिक कृषी पतसंस्थांची व नवीन उद्योगधंद्याची निर्मिती करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण पुणे येथील शिवाजीनगर परिसरातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट येथे  दि. 12 मार्च रोजी सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत दिले जाणार आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच, तरूणांनी नोंदणी करावी, असे आवाहन कार्यक्रम संचालक नितीन जाधव यांनी केले आहे.  नोंदणी  http://lifestartupuniverse.com/vamnicom/ या संकेतस्थळावर करावी. अधिक माहितीसाठी 9547049547 किंवा 8670068670 किंवा 9890933567 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा.  

००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ