जिल्हाधिकारी कार्यालय होणार ऊर्जा कार्यक्षम

 जिल्हाधिकारी कार्यालय होणार ऊर्जा कार्यक्षम  

          अकोला, दि. 6 :  ऊर्जा बचतीसाठी महत्वाचे पाऊल म्हणुन जिल्हाधिकारी कार्यालयात आता ‘एनर्जी ऑडिट’ करून बचतीचे उपाय अवलंबण्यात येणार आहेत.

            त्यादृष्टीने जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी ‘मेडा’च्या अधिका-यांसह परिसराची गुरूवारी पाहणी केली. ‘मेडा’चे जिल्हा व्यवस्थापक विजय काळे उपस्थित होते. जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार  श्री छत्रपती शिवाजी सभागृह, नियोजन भवन या इमारतीचे ऊर्जा लेखा परीक्षणाचे काम सुरु झाले आहे. त्यासाठी ‘महाऊर्जा’च्या योजनेतुन 20 हजारपर्यंत अनुदान उपलब्ध होणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथील श्री वेदांत एनर्जी यांच्याकडुन ‘महाऊर्जा’च्या देखरेखेखाली हे काम सुरु झाले. इमारतीमध्ये ऊर्जा बचतीच्या शक्यता लक्षात घेऊन अहवाल जिल्हाधिका-यांना सोपविण्यात येणार आहे.

            ऊर्जा संवर्धन कायदा सन 2001 अंतर्गत ऊर्जा बचत हे राष्ट्रीय कर्तव्य असुन जिल्ह्यातील सर्व औद्योगिक कंपनी, खाजगी इमारती, शासकीय, निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था आदी क्षेत्रांमध्ये ऊर्जा बचतीस मोठी वाव असुन महाऊर्जाच्या ऊर्जा संवर्धनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा व ऊर्जा बचतीस चालना द्यावी. यावेळी भविष्यात नविन इमारती ह्या ऊर्जा कार्यक्षमच असाव्यात यासाठी स्थापत्य अभियंता, आर्किटेक्ट, बांधकाम व्यावसायिक यांनी पुढाकार घ्यावा व महाऊर्जामार्फत प्रयत्न व्हावेत, अशी सूचना जिल्हाधिका-यांनी यावेळी केली. 

            सर्व औद्योगिक कंपनी, खाजगी इमारती, शासकीय, निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था आदी क्षेत्रातील संस्थानी ऊर्जा संवर्धनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी महाऊर्जा कार्यालयास किंवा 9561116226 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन श्री. काळे यांनी केले.

०००



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ