अकोला पश्चिम मतदारसंघात बाईक रॅलीद्वारे मतदार जनजागृती





अकोला पश्चिम मतदारसंघात बाईक रॅलीद्वारे मतदार जनजागृती

अकोला, दि. 31 : अकोला पश्चिम मतदारसंघात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातर्फे आज बाईक रॅली काढून मतदार जनजागृती करण्यात आली. अकोलेकरांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

लोकसभा निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी ‘स्वीप’अंतर्गत उपक्रमांना गती देण्यात आली आहे. त्याअंतर्गत विविध माध्यमांतील प्रसिद्धीबरोबरच नागरिकांशी संवाद, रॅली आदी अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्यानुसार आज पंचायत समितीपासून शहरात रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय चौक, अशोकवाटिका चौक, बसस्थानक, जिल्हा क्रीडा संकुल चौक, रेल्वेस्थानक चौक, रामदासपेठ पोलीस ठाणे अशा विविध चौकांतून रॅली पुढे जात सावित्रीबाई फुले कन्या शाळा येथे समारोप झाला.  

 ‘स्वीप’च्या नोडल अधिकारी बी. वैष्णवी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनिता भालेराव, शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार, गटशिक्षणाधिकारी श्याम राऊत, समन्वय अधिकारी गजानन महल्ले यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

लोकशाही प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी प्रत्येकाने आपला मताधिकार बजावला पाहिजे. या निवडणुकीत प्रत्येकाने मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडुया, असे आवाहन श्रीमती वैष्णवी यांनी यावेळी केले. श्रीमती भालेराव यांनीही मनोगत व्यक्त केले.रॅलीत अधिकारी व कर्मचा-यांसह अनेक नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

 कलेक्टर ऑफिसपासून मंगळवारी भव्य बाईक रॅली

‘स्वीप’अंतर्गत ‘रॅली फॉर डेमोक्रसी’ हा मोटरसायकल रॅलीचा उपक्रम मंगळवारी, दि. 2 एप्रिल रोजी सकाळी 7:30 वा. आयोजित करण्यात आला आहे. त्याची सुरूवात जिल्हाधिकारी कार्यालयापासून होईल. पुढे ही रॅली अशोक वाटिका, नेहरू पार्क, सिव्हिल लाईन चौक, रतनलाल प्लॉट चौक, जिल्हा क्रीडा संकुल चौक, अकोट स्थानक- माणेक टॉकीज,सिटी कोतवाली, गांधी रोड, पंचायत समिती, पोलीस लॉन अशी जाऊन पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन समारोप होईल.

शहरातील सर्व व्यवस्थापनांच्या व माध्यमांच्या शाळांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विषय साधन व्यक्ती, विशेष शिक्षक, तसेच सर्वच शासकीय कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत. नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी मॅडम यांनी केले आहे.

०००


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ