ज्येष्ठांच्या बी.सी.जी. लसीकरणाबाबत जनजागृती करा - जिल्हाधिकारी अजित कुंभार

 



ज्येष्ठांच्या बी.सी.जी. लसीकरणाबाबत जनजागृती करा

- जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला दि. 20 : ज्येष्ठांच्या बी.सी.जी. लसीकरणाबाबत जनजागृती  करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात टास्क फोर्स सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते. सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, माता व बाल संगोप अधिकारी डॉ. विनोद करंजीकर, जिल्हा क्षयरोग अधिकरी डॉ. मनिष शर्मा, वैद्यकारी अधिकारी डॉ. अलका बोराखडे, जिल्हा क्षयरोग केंद्र तसेच डॉ. सिमा तायडे (FOGSI) डॉ. मोनाली कदम, डॉ. सोळंके, डॉ. सतीश घाटोळ उपस्थित होते.

साठीपुढील, १८ वर्षावरील जे मधुमेहाचे रुग्ण, बॉडी मास्क इंडेक्स १८ पेक्षा कमी असणारे (कुपोषित प्रौढ), मागील ५ वर्षातील क्षयरोगमुक्त रुग्ण तसेच क्षयरोग रुग्णांच्या मागील तीन वर्षातील सहवासातील रुग्ण आदी सर्व लसीसाठी पात्र आहेत. याबाबत समाजामध्ये जनजागृती करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

आशांनी घरोघरी जान सर्व्हेरून त्याबाबत जागृती निर्माण करावी व लोकांना लसीचे महत्त्व पटवून द्यावे, असे आवाहन करण्यात आले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ