खर्च निरीक्षकांकडून निवडणूक यंत्रणेचा आढावा




लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

निवडणूक खर्च निरीक्षक बी. ज्योतिकिरण (भा. रा. से.) जिल्ह्यात दाखल

खर्च निरीक्षकांकडून निवडणूक यंत्रणेचा आढावा

अकोला, दि. 29 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने अकोला मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी श्रीमती बी. ज्योतिकिरण यांची भारत निवडणूक आयोगाने नियुक्ती केली असून, त्या गुरूवारी जिल्ह्यात दाखल झाल्या. त्यांनी आज सकाळी नियोजनभवन येथे बैठक घेऊन निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला.

निवडणूक निर्णय अधिकारी अजित कुंभार, 'स्वीप'च्या नोडल अधिकारी बी. वैष्णवी, आदर्श आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर यांच्यासह सर्व सहायक निवडणूक अधिकारी, तसेच नोडल अधिकारी उपस्थित होते.

निवडणूक खर्च निरीक्षकांनी सर्व सहायक निवडणूक अधिकारी व नोडल अधिका-यांकडून निवडणूकीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली. निवडणूक काळात प्रलोभन दाखविण्यासाठी साड्या, मद्य, वस्तू, पैसे यांचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे सजग राहून अशा बाबींना तत्काळ निर्बंध घालावा व संबंधितांवर कारवाई करावी. उमेदवाराकडून प्रचारासाठी केल्या जाणा-या प्रत्येक खर्चाची काटेकोरपणे नोंद घ्यावी. निवडणूक आयोगाच्या निर्देश व सूचनांचा कुठेही भंग होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असे निर्देश खर्च निरीक्षकांनी दिले.

निवडणूक खर्च संनियंत्रणासाठी लेखा पथके, निरीक्षण पथके, भरारी पथके, व्हिडीओ देखरेख पथके, तसेच लेखा, कॅश, बँक रजिस्टर, विवरणपत्रे, शॅडो रजिस्टर, माध्यम खर्च संनियंत्रण अहवाल, प्राप्तीकर विभाग, तसेच बँकांकडून प्राप्त अहवाल आदींबाबत माहिती खर्च निरीक्षकांनी यावेळी यंत्रणेकडून घेतली.

खर्च निरीक्षकांचा संपर्क क्रमांक 

निवडणूक खर्च निरीक्षक यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8626059320 असा आहे. लोकसभा मतदारसंघात कुठेही आचारसंहितेचा भंग होत असल्याचे आढळल्यास, तसेच उमेदवारांच्या खर्चाबाबत कुठलीही माहिती द्यावयाची असल्यास या क्रमांकावर राजकीय पक्ष अथवा नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

0000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ